शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोथूळ सोसायटी सचिवाचे अपहरण; नाहटा, पानसरे यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:35 IST

कोथूळ सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक घेऊ नये म्हणून एका सोसायटीच्या सचिवाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे शनिवारी रात्री घडली. याप्रककरणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुध्द पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

श्रीगोंदा : कोथूळ सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक घेऊ नये म्हणून एका सोसायटीच्या सचिवाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे शनिवारी रात्री घडली. याप्रककरणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्याविरुध्द पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, कोथूळ संस्थेचे सचीव राजेंद्र मधुकर (खोल्लम, रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा) यांचे शनिवारी (दि.११ जानेवारी) नाहटा, पानसरे व त्यांच्या सहकाºयांनी अपहरण केले. त्यांंना एका निर्जनस्थळी खोलीत डांबून ठेवले. रविवारी होणाºया सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीस हजर राहिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील धमकी दिली. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात दत्तात्रय भाऊसाहेब, पानसरे, बाळासाहेब उर्फ प्रवीण कुमार बन्सीलाल नाहाटा, कल्याण बाबासाहेब शिंदे, धनंजय सुधाकर लाटे, विजय पाटोळे, महेश पानसरे, बाजीराव कळमकर, अमोल लाटे यांच्या विरोधात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.  जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीचा ठराव घेण्यातून ही घटना घडल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. आरोपींनी बैठकीस गैरहजर रहावे म्हणून सचिव राजेंद्र खोल्लम यांना पिंपळगाव पिसा येथून मोटारसायकल बसविले. नंतर घारगाव येथे आणले.  यानंतर चार चाकी वाहनातून पुणे कृषी विद्यापीठात जबरदस्तीने बसवून नेले. सोसायटीचा चार्ज का आणला? असे म्हणून उद्याचा ठराव झाला तर तुला गाडीखाली चिरडून मारून टाकू? असा दम दिला. यानंतर त्यांना एका खोलीमध्ये डांबून ठेवले. आरोपी क्रमांक २ ते ८ यांनी ठराव झाला तर तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली, असेही तक्रारीत म्हटले आहे. बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटनास्थळास भेट दिली. पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराडे करीत आहेत.राजकीय संघर्षातून घटनासध्या जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी सोसायटी प्रतिनिधीचे ठराव करण्याचे काम चालू आहे. माजी आमदार राहुल जगताप जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे हे आमने-सामने उतरणार आहेत. आपल्या बाजूचे ठराव संमत होण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे राजकीय संघर्ष उफाळू आला आहे. त्यामुळे सचिवांची कोंडी झाली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्रElectionनिवडणूक 2024Shrigondaश्रीगोंदाPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी