जनावरांचा मृत्यू जवळपास वीसच्या आसपास पोहचला आहे. यामध्ये काही शेळ्यादेखील दगावल्या आहेत. जिल्हा पशुसंवर्धन प्रशासन गावात तळ ठोकून बसले आहे. प्रशासकीय अधिकारी प्रत्येक घटनास्थळी भेट देऊन उपचार व मार्गदर्शन करत आहेत. गावात १३ गाई, ६ कालवडी, ४ शेळ्या एकूण २३ जनावरे दगावली आहे.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, सहायक आयुक्त पी. वाय. ओहळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर शेळके, रामभाऊ पवार, शैलेश बन, माजी पोलीस पाटील सुभाष गमे, पोलीस पाटील सुरेश गमे, पी. डी. गमे, बाळासाहेब गमे, देवराम कांदळकर, सुनील गमे, तबाजी घोरपडे, पुंडलिक गमे, पुंडलिक वाघे, नामदेव घोरपडे, काळू रजपूत, श्रीनिवास घोरपडे, दीपक कांदळकर, कैलास घोरपडे, विशाल वाघे, अविनाश गमे, गणेश घोरपडे, शिवाजी गमे, हरिभाऊ गायकवाड, एकनाथ रजपूत, बी. एच. गमे, दत्तात्रय गुंजाळ, वाय. ए. देशमुख, बाळासाहेब तुरकने, चांगदेव कांदळकर, सागर सोनवणे उपस्थित होते.
--------
*गावात जनावरांच्या खुरकत आजाराची सुरुवात होत असल्यामुळे लोकमत प्रतिनिधी नितीन गमे यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ सुनील तुंबारे यांना शनिवारी फोन केला असता त्यांनी तत्काळ उपचारासाठी राहाता पशुसंवर्धन टीम पाठवून उपचारासाठी सुरुवात केली, शनिवारपासून ते आजपर्यंत प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे, यामुळे प्रशासकीय पशुसंवर्धन विभागावर गावातील ग्रामस्थांनी कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही.
------
फोटो - आ राधाकृष्ण विखे केलवड घटनास्थळी पाहणी करताना.