शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हितासाठी भाजपला दूर ठेवा-अजित नवले; किरण लहामटेंच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 13:28 IST

शेतकरी वाचवायचा असेल तर या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपला मतदान करु नका, अशी टीका शेतकरी नेते कॉ. अजित नवले यांनी लिंगदेव येथील सभेत केली. 

अकोले : शेतकरी वाचवायचा असेल तर या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपला मतदान करु नका, अशी टीका शेतकरी नेते कॉ. अजित नवले यांनी लिंगदेव येथील सभेत केली. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांचे प्रचारार्थ मंगळवारी लिंगदेव येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, मोदी सरकारने भूलथापा देऊन शेतक-यांचे जगणे मुश्किल केले आहे. बेरोजगारी वाढली आहे. कालपर्यंत अकोलेवर त्यांच्यावर टीका करत होते. आज तेच त्यांची आरती ओवाळू लागले आहेत. शेतक-यांची हत्या करणा-या या सर्वांना सत्तेपासून दूर ठेवा. भागाजी फापाळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. डॉ. लहामटे म्हणाले, मतदार संघात विकास पाहिजे असेल तर दूरदृष्टीचा नेता असायला पाहिजे. मला एक संधी दिल्यास शिक्षण, आरोग्य, पाणी यांसह मूलभूत समस्या सोडवेल. दुपारी डॉ. लहामटे यांनी आढळा खो-यातील विश्रामगड परिसरातील गावांमध्ये प्रचारदौरा केला. खिरविरे येथेही सभा झाली. अशोक भांगरे, यमाजी लहामटे, सुनीता भांगरे, विनोद हांडे, मारुती मेंगाळ यांनी शेरणखेल येथे डॉ. लहामटे यांच्या प्रचारार्थ  मंगळवारी सकाळी सभा घेतली. पिंपळगाव नाकविंदा, पिंपरकणे, मान्हेरे, आंबेवंगण, वारंघुशी भागात प्रचार केला.बारामतीसारखा विकास व्हावाविनय सावंत म्हणाले, एकास एक उमेदवारामुळे आता ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. यावेळी पिचडांचा पराभव अटळ आहे. तालुक्याचा बारामती किंवा संगमनेरसारखा विकास व्हायला हवा होता, तो झाला नाही. विरोधक हे भाग्यविधाता नसून भकासविधाते आहेत. त्यांना राजूरमध्ये पिण्याचे पाणी देता आले नाही. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019