शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केडगाव दुहेरी हत्याकांड : राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना खोट्या गुन्ह्यात अडकविले - वळसे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 15:04 IST

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे़ त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने हे कृत्य का केले ते पोलिसांना सांगितलेही आहे. तरीही शिवसेनेने सत्तेचा वापर करुन राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना या प्रकरणात अडकविले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांनी सांगितले.

अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने हे कृत्य का केले ते पोलिसांना सांगितलेही आहे. तरीही शिवसेनेने सत्तेचा वापर करुन राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना या प्रकरणात अडकविले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांनी सांगितले.राष्ट्रवादी भवनमध्ये वळसेपाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, ज्या आरोपीने हे कृत्य केले आहे, त्याचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही़ तो पक्षाचा सदस्य नाही. या घटनेच्या चौकशीसाठी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस ठाण्यात बोलावले असता तेथे तरुणांची मोठी गर्दी झाली होती. तेथे ज्या तरुणाने पोलीस ठाण्याची काच फोडली त्याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे. पण तसे न करता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केडगाव हत्याकांडाशीही राष्ट्रवादीचा काहीही संबंध नसताना या प्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना गोवण्याचा प्रयत्न केला आहे. यात राजकीय षढयंत्र आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या लोकप्रियतेची धास्ती त्यांनी घेतली आहेत. त्यामुळे त्यांनी हे आरोप लावले आहेत़ राष्ट्रवादीच्या आमदारांना असे खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आहे, हे खपवून घेतले जाणार नाही. शिवसेनेने आरोप सिद्धध करावेत अन्यथा कारवाईला तयार रहावे. या प्रकरणी अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही वळसे यांनी सांगितले. यावेळी आमदार राहूल जगताप, आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माणिकराव विधाते, सुजित झावरे आदी उपस्थित होते.

..... तरीही कळमकरांवर गुन्हा

घटनेनंतर पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलावले होते़ त्यावेळी तेथे तोडफोड कोणी केली, याचा पोलिसांनी शोध घ्यावा़ एका पोलिसाच्या फिर्यादीवरुन निरापराधांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाभाऊ कळमकर यांच्या डोळ्याचे आॅपरेशन झाले आहे. त्यामुळे ते पोलीस ठाण्यात गेलेही नव्हते तरीही त्यांचेही या नाव या गुन्ह्यात ओवण्यात आले आहे. अशा पद्धतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना