शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून कातोरे, शेटिया, भाजपचे अांंधळे स्वीकृत, सेनेचे शेळके,आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 13:19 IST

अहमदनगर : महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विपुल शेटिया आणि अ‍ॅड. राजेश कातोरे, शिवसेनेकडून संग्राम शेळके आणि मदन आढाव, भाजपकडून रामदास आंधळे यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केल्याची घोषणा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी महापालिकेच्या सभेत केली.

अहमदनगर : महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विपुल शेटिया आणि अ‍ॅड. राजेश कातोरे, शिवसेनेकडून संग्राम शेळके आणि मदन आढाव, भाजपकडून रामदास आंधळे यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केल्याची घोषणा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी महापालिकेच्या सभेत केली.

महापालिकेची आज दुपारी एक वाजता आॅनलाईन सभा झाली. या सभेत गटनेत्यांकडून आलेली बंद पाकिटे आयुक्तांनी तपासली. त्यानंतर पाचही नावांची घोषणा महापौर वाकळे यांनी केली. पाचपैकी सेनेचे शेळके, व राष्ट्रवादीचे शेटिया यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याचा आक्षेप होता. मात्र तोही निकाली काढण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेसकडून कातोरे, शेटिया यांची नावे याआधीच निश्चित करण्यात आली होती. शिवसेनेची नावेही हयात असतानाच स्व. अनिल राठोड यांनी निश्चित केली होती. राठोड यांच्या निधनानंतरही कोणतीही गडबड न करता त्यांचा शब्द पाळला आणि दोघांची शिफारस केली. राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांनीही दोघांच्या नावाला संमती दिली.

भाजपमध्येच धुसफूस सुरू होती. मात्र महापालिका निवडणूक झाल्यानंतर भाजपने आंधळे यांचे नाव अंतिम केले होते. त्यांचे नाव यापूर्वीच्या सभेत फेटाळण्यात आले होते. मात्र गुरुवारच्या सभेत ते निश्चित करण्यात आले. त्यामुळे भाजपमध्ये आता त्यावर काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका