शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

कर्जतमध्ये विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण, शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 15:39 IST

तालुक्यातील पिंपळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गणित चुकल्याचा राग आल्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या टाळ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे पिंपळवाडी शाळेतील घटनाविद्यार्थी गंभीर जखमीपुणे येथील रुग्णालयात दाखलशिक्षणाधिका-यांनी केले शिक्षकाचे निलंबन

कर्जत (जि. अहमदनगर) : तालुक्यातील पिंपळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गणित चुकल्याचा राग आल्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या टाळ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. १० एप्रिल) सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.कर्जत तालुक्यातील कुळधरणनजीकच्या पिंपळवाडी येथील रोहन दत्तात्रय जंजिरे या दुसरीत शिकणा-या विद्यार्थ्याला ही अमानुष मारहाण झालेली आहे. चंद्रकांत सोपान शिंदे असे या मारहाण करणा-या शिक्षकाचे नाव असून, ते राशीन येथील रहिवासी आहेत. रोहनकडून गणित चुकल्यामुळे शिक्षकाने हा प्रकार केला असल्याचे समोर येत आहे. लाकडी छडी तोंडात घालून मारहाण केल्याने रोहनच्या तोंडात गंभीर दुखापत झालेली आहे. पडजिभेमागील बाजू तुटल्याने त्याला श्वास घेण्यात अडचणी येत असल्याची माहिती रोहनचे वडील दत्तात्रय जंजिरे यांनी दिली.या अमानुष प्रकाराबाबत विद्यार्थ्याची आई सुनीता दत्तात्रय जंजिरे यांनी कर्जत पोलीस स्टेशनला शिक्षक चंद्रकांत सोपान शिंदे याच्याविरोधात पोलिसांनी भादंवि कलम ३२४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल एम. आर. गाडे हे पुढील तपास करीत आहेत.शिक्षणाधिका-यांनी केले शिक्षकाचे निलंबनविद्यार्थ्याला मारहाणीचा प्रकार समोर आल्यानंतर कर्जतच्या शिक्षण विभागाने पिंपळवाडी येथे येऊन विद्यार्थी, तसेच पालकांचे जबाब घेतले. त्यानुसार जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला. त्यानुसार शिक्षण विभागाने त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली. तसा आदेश आज काढण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजताच कर्जतचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन संतप्त ग्रामस्थांशी चर्चा केली. जखमी रोहनला उपचारासाठी सुरूवातीला राशीन हलवले. येथून त्याला उपचारासाठी बारामती येथे हलविले. तेथे देखील योग्य उपचार झाले नसल्याने रोहनला पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. शिक्षकाने केलेल्या या मारहाणीचा ग्रामस्थांनी निषेध केला असून, पालकांत संतापाचे वातावरण आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत