कर्जत : पोलीस पथकाने अवैध दारू विक्री करणाऱ्या तालुक्यातील वेगवेगळ्या ११ ठिकाणी छापे टाकून १ लाख ५५ हजार ८७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांनी दिली. पोलिसांनी कारवाई केलेली गावे व आरोपी असे : जाफर बंडूभाई शेख (रा. बेलवंडी), महादेव लक्ष्मण नवले (रा. चांदा), किरण रघुनाथ गंगावणे (रा. चांदा), भरत चद्रकांत घालमे (रा. शिंदा), जयश्री हनुमंत पवार (रा. कर्जत), राजेंद्र विश्वनाथ भोसले (रा. टाकळी खंडेश्वरी), इस्राईल शब्बीर पठाण (रा. टाकळी खंडेश्वरी), शालन सोनबा शिंदे (रा. जलालपूर), आकाश सुनील मांडगे (रा. रेहेकुरी), महेश अरुण गोडसे (रा. जोगेश्वरी वाडी), गंगाराम सर्जेराव आडगळे (रा. रवळगाव). उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, सलीम शेख, तुळशीराम सातपुते, प्रल्हाद लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, गोवर्धन कदम, श्याम जाधव, भाऊसाहेब काळे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, तिकटे, पोलीस कॉन्स्टेबल कोमल गोफणे, पो.ना. जयश्री गायकवाड यांनी ही कारवाई केली.
कर्जत पोलिसांचे अवैध दारू विक्रीवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST