शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत- जामखेडला मिळणार कुकडीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 14:07 IST

कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्पानुसार कर्जत-जामखेड तालुक्यातील गावांना कुकडी धरणाचे पाणी मिळणार आहे. याबाबत मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकाराने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

ठळक मुद्देतुकाई चारीसह चौंडी, दिघी, जवळासह इतर बंधारे होणार फुल

अहमदनगर : कुकडी प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्पानुसार कर्जत-जामखेड तालुक्यातील गावांना कुकडी धरणाचे पाणी मिळणार आहे. याबाबत मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकाराने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत कर्जत-जामखेड तालुक्याला कुकडीचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला.तुकाई चारीसह चौंडी, दिघी, जवळा बंधारे, पाटेवाडीसह इतर बंधा-यांत कुकडीचे पाणी सोडले जाणार आहे. कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामधून भोसे खिंड बोगद्याद्वारे सीना मध्यम प्रकल्पामध्ये २२५ दशलक्ष घनफूट पाणी देण्यास मान्यता देण्यात आली. याबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना शासनाने सूचनादिल्या आहेत. कुकडी डावा कालव्याचे कर्जतमधील निमगाव चारी, त्यापुढे अंदाजे ९ किलोमीटर नाल्याव्दारे व नदी पात्रामधून चौंडी, दिघी व जवळा बंधा-यामध्ये पाणी सोडले जाणार आहे. तुकाई उपसा सिंचन योजना आणि बिटकेवाडी पाझर तलावातील सध्याच्या पाझर तलावाचे काम प्रचलित नियमानुसार करण्यात येणार असून जलसंधारण विभाग कामे पूर्ण करणार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतJamkhedजामखेडWaterपाणी