शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तनपुरेंविरोधात कर्डिले-विखेंनी दंड थोपटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 18:23 IST

तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामात तनपुरे पिता पुत्रांविरोधात आमदार शिवाजी कर्डिले व डॉ. सुजय विखे यांच्यात कलगीतुरा रंगला. कारखान्यात मी हात घातला असून पुन्हा कारखाना विरोधकांच्या ताब्यात जाऊ देणार नाही, अशी घोषणा विखे यांनी केली.

राहुरी : तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामात तनपुरे पिता पुत्रांविरोधात आमदार शिवाजी कर्डिले व डॉ. सुजय विखे यांच्यात कलगीतुरा रंगला. कारखान्यात मी हात घातला असून पुन्हा कारखाना विरोधकांच्या ताब्यात जाऊ देणार नाही, अशी घोषणा विखे यांनी केली. हाच धागा पकडत कर्डिलेंनी पक्ष बाजूला ठेऊन प्रसाद तनपुरे यांच्या ताब्यात एकही संस्था जाऊ दिली जाणार नाही. त्यासाठीच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याशी राजकीय सोयरीक केल्याचा निर्वाळा दिला.डॉ. सुजय विखे यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर तोफ डागत त्यांचा समाचार घेतला. आ. कर्डिले हे थेट सभास्थानी येण्याऐवजी कारखान्यात मशनरी आहे का ते पहाण्यासाठी कारखान्यात गेले. पुर्वीच्या सत्ताधा-यांनी नटबोलटासह सामान घरी नेले. आम्ही बंद पडलेला कारखाना सुरू करून चपकराक दिल्याचा टोला विखेंनी लगावला. चोरी भ्रष्टाचार करणारे घरी गेले आहेत. आम्ही निकृष्ट कारखाना सुरू केला असून पुढील वर्षी साडेपाच लाख टन ऊ साचे गाळप करू अशी ग्वाही देताच उपस्थितांनी टाळयांच्या गजराज स्वागत केले. पुढील वर्षी बाहेरून भुसा विकत आणावा लागणार नसुन शासनाच्या साखर धोरणावर विखे यांनी कर्डीले यांच्याकडे पहात टिकाही केली.विखे यांच्या भाषणाचा धागा पकडून आमदार शिवाजी कर्डीले म्हणाले, मी विखेेंना मदत केली हे खरे असले तरी सर्व डाव शिकविलेले नाहीत. पुर्वी तनपुरे यांनी पाप झाकविण्यासाठी कामगारांच्या नावाने बदनामी केली. ३०० कोटी रूपयांचे पाप झाकविण्यासाठी तो एक टाकलेला डाव होत. क़ारखान्याच्या माध्यमातुन राजकारणावर खर्च करणा-यांना यापुढे एकही सत्ता हाती येऊ दिली जाणार नाही. त्यासाठी विखेंशी संगणमत केले असून वकील म्हणून कारखान्याला सर्वोैतोपरीने मदत करण्याची घोषणा आमदार कर्डीले यांनी केली.प्रास्तविकात अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी सांगितले, यंदाच्या गळीत हंगामात २ लाख १९ हजार टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. क़ामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांचेही भाषण झाले. सुत्रसंचालन गणेश विघे यांनी केले. आभार सुरसिंग पवार यांनी मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिले