शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वतावर चोरीचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 11:15 IST

भाविकांनी कानिफनाथ देवस्थानच्या दान पेटीत टाकलेली देणगी मोजणी करीत असताना देवस्थानचे सचिव सुधीर भाऊराव मरकड यांनी तीस हजार रुपये चोरल्याप्रकरणी त्यांच्यावर पाथर्डी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पाथर्डी : भाविकांनी कानिफनाथ देवस्थानच्या दान पेटीत टाकलेली देणगी मोजणी करीत असताना देवस्थानचे सचिव सुधीर भाऊराव मरकड यांनी तीस हजार रुपये चोरल्याप्रकरणी त्यांच्यावर पाथर्डी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. देशभरात कानिफनाथ देवस्थान हे भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. या देवस्थानाला भाविक मोठ्या प्रमाणावर रोख देणगी देत असतात. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला देणग्यांची मोजदाद होत असते. देणगी मोजण्यासाठी येथील कर्मचाºयांना खिसे नसलेले ड्रेस कोड ठरवून दिलेला आहेत. अपहार होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवलेले आहेत. देणगी रकमेची मोजणी करताना धर्मदाय आयुक्त कार्यालयातील एक प्रतिनिधी यावेळी उपस्थित असतो. परंतु ५ आॅगस्ट २०१९ रोजी सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे दक्षिणा पेटीतील मोजणी सुरू होती. यावेळी मोजदाद कक्षात विश्वस्त सचिव सुधीर भाऊराव मरकड यांनी ५०० रुपये रकमेच्या ६० नोटा अशी ३० हजार रुपये रकमेचा बंडल स्वत:च्या खिशात घातले. ही रक्कम चोरताना देवस्थानचे कर्मचारी अशोक कुंडलिक मरकड यांनी पाहिले. याबाबत देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेºयात चित्रीकरण देखील झालेले आहे. याबाबत त्यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या, परंतु कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सदर प्रकार अध्यक्ष शिवशंकर राजळे यांना मरकड यांनी सांगितला. दरम्यान १६ आॅगस्ट रोजी मढी येथे ग्रामसभा घेण्यात आली. यात पैसे चोरणाºया विश्वस्त आरोपी सुधीर मरकड यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव केला. देवस्थानच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :theftचोरीAhmednagarअहमदनगर