शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी : नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक वळविली, पोलीस बंदोबस्त तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 17:43 IST

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांचा बुधवार (दि.१आॅगस्ट) रोजी कायगाव टोका येथे दशक्रिया विधी होणार आहे.

नेवासा : मराठा आरक्षण आंदोलनामध्ये जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांचा बुधवार (दि.१आॅगस्ट) रोजी कायगाव टोका येथे दशक्रिया विधी होणार आहे. या दशक्रिया विधीसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असल्याची शक्यता असल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून औरंगाबाद - पुणे या महामार्गावरील वाहतूक पैठण, शेवगांव मार्गे वळवण्याचा निर्णय औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे.कायगाव टोका येथील आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या ७६ आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी ३१ जणांवर गंभीर गुन्हे दाखल केले. आंदोलन प्रकरणातील राज्यातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अन्यथा शहीद काकासाहेब शिंदे यांच्या कायगाव येथील गोदावरी पुलावरील जलसमाधीस्थळी जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकानी सोशल मिडियाद्वारे इशारा दिला आहे. त्यामुळे कायगांव येथील गोदावरी पुलावर सोमवारी रात्रीपासूनच औरंगाबाद तसेच नेवासा पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे१ आॅगस्ट रोजी अहमदनगर येथून औरंगाबादकडे येणा-या वाहन धारकांनी पांढरीपूल- शेवगाव-पैठण -बिडकीन- औरंगाबाद मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. सर्व वाहन धारकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा व वाहतूक कोंडी टाळावी. कोणालाही त्रास होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी केले आहे.गोदावरी नदी वरील जुन्या व नवीन पुलावर दक्षिणेकडे औरंगाबाद पोलिसांनी तर उत्तरेकडे नेवासा पोलिसांनी सोमवारी रात्री पासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये नेवासा हद्दीत तीन अधिकारी व ५० पोलीस कर्मचारी तर नेवासा फाटा येथे एक अधिकारी व १० कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी दिली. नेवासा बस आगाराच्या औरंगाबादकडे जाणा-या सर्व बस १ आॅगस्ट रोजी बंद ठेवणार असल्याचे स्थानक प्रमुख रमेश सोनवणे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNevasaनेवासाAurangabadऔरंगाबाद