शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकी बहाल करणा-या केडगावमधूनच जगतापांना धक्का : विखेंना तब्बल ८ हजारांचे लीड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 11:27 IST

केडगाव उपनगराला गृहीत धरून आपले राजकीय आडाखे बांधणा-या प्रस्थापित राजकीय नेत्यांना केडगाव पॅटर्नने या निवडणुकीत जोरदार दणका दिला.

योगेश गुंडकेडगाव :केडगाव उपनगराला गृहीत धरून आपले राजकीय आडाखे बांधणा-या प्रस्थापित राजकीय नेत्यांना केडगाव पॅटर्नने या निवडणुकीत जोरदार दणका दिला. ज्या केडगावने संग्राम जगताप यांच्या आमदारकी बहाल केली त्याच केडगावकरांनी डॉ. सुजय विखे यांना ८ हजारांचे लीड देत अनेकांची राजकीय गणिते चुकवली.केडगावची काँग्रेस विखे गटाला मानणारी असल्याने सुरूवातीपासुनच भाजपचे सुजय विखे यांनी केडगावमध्ये आपले राजकीय बस्तान पक्के केले. आरोग्य शिबीरे व हळदीकुंकू यासारख्या कार्यक्रमामुळे त्यांनी केडगावकरांवर आपला प्रभाव पाडला. मनपा निवडणुकीतही त्यांनी केडगावमध्ये जास्त लक्ष घालुन येथील राजकारण बारकाईने समजुन घेतले. कोतकर काँग्रेसचा भाजप पॅटर्न फेल गेल्याने कोतकर यांचे भाजपमध्ये गेलेले समर्थक पुन्हा लोकसभा निवडणुकीसाठी विखे यांच्या मांडवात आले. मात्र राष्ट्रवादीने ऐनवेळी आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी बहाल केल्याने या समर्थकांची कोंडी झाली. अनेकांनी भुमिगत राहुन विखे यांचा प्रचार करून दिलेला शब्द पाळला तर काहींनी जगताप यांचा रोष ओढाऊन उघडपणे विखे यांचा प्रचार केला. केडगावच्या शिवसेनेनेही जगताप यांना शह देण्यासाठी विखे यांच्या मागे पुर्ण ताकद उभी केली. शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह सेना नगरसेवक, कोतकर गटाचे माजी नगरसेवक, भाजपमधुन विखे यांच्याकडे आलेले माजी नगरसेवक असी मोठी फौज विखे यांना ताकद देण्यासाठी मैदानात उतरली. याउलट जगताप समर्थकांची राजकीय कोंडी झाल्याने त्यांना उघड प्रचार करण्यात अनेक अडचणी आल्या. यामुळे जगताप यांच्या मागे केडगावमधील कोणतीच राजकीय शक्ती उघडपणे त्यांच्या मागे उभी राहिली नाही.जगताप यांना विधानसभा निवडणुकीत केडगावमधुन २ हजार मतांची आघाडी मिळाल्यामुळे गेल्या २५ वर्षापासून सेनेला सुरू असलेल्या लीडची परंपरा मागील वेळी केडगावकरांनी मोडीत काढली. मात्र ज्या केडगावमुळे जगताप यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर झाला त्याच केडगावमधून विखे यांना तब्बल ८ हजार मतांचे दणदणीत लीड मिळाले. केडगाव मध्ये झालेल्या १६ हजार ४९९ मतांपैकी विखे यांना ११ हजार ९६९ मते तर आमदार संग्राम जगताप यांना केवळ ३ हजार ८४३ इतके मते मिळाली. विकासकामे करूनही मध्यंतरी केडगावकरांचा संपर्क तुटल्याने व केडगाव पॅटर्न तोपर्यंत विखे यांच्या मागे खंबीर उभा राहिल्याने त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारा कोणीच प्रभावी समर्थक जास्त पुढे आले नाहीत. यामुळे केडगाव मध्ये जगताप यांची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली .केडगावात प्रचार टाळलाकेडगाव हत्याकांडाची घटना घडल्यानंतर जगताप यांनी उघडपणे व पहिल्यासारखे केडगाव मध्ये येणे बंद केले होते. या निवडणुकीच्या प्रचाराच्या बैठकाही कुणाच्या तरी घरी घेण्यात आल्या. उघड प्रचार करणे मात्र त्यांनी टाळले त्याचाही परिणाम मतांची टक्केवारी कमी होण्यावर झाला.विखे आता ‘केडगावकर’ होणार का ?लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सुजय विखे यांच्यावर ‘परका’ म्हणुन आरोप झाले त्यावेळी त्यांनी भर सभेत आपण निवडुन आलो तर केडगावमध्ये जागा घेऊन तेथे घर बांधील व केडगावला राहयला येईल असे आश्वासन दिले होते. आता विखे खरच केडगावकर होणार का याची उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगरSujay Vikheसुजय विखे