कोपरगाव : के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या वेळी ‘पर्यावरण आणि मी’ या विषयावर सी. टी. बोरा महाविद्यालय (शिरूर) येथील वनस्पतीशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. अयोध्या क्षीरसागर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
ऑनलाईन व्याख्यानास प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, उपप्राचार्य डाॅ. एस. आर. पगारे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक एस. के. बनसोडे, प्रा. व्ही. सी. ठाणगे, डाॅ. अभिजित नाईकवाडे, डाॅ. बी. एस. गायकवाड, डाॅ. एस. एस. नागरे, डाॅ. एस. बी. भिंगारदिवे, प्रा. डाॅ. गणेश निमसे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बी. एस. गायकवाड यांनी केले, तर डाॅ. एस. एस. नागरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. एस. के. बनसोडे, प्राचार्य डॉ. बी एस. यादव, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव संजीव कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.