शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडची जलवाहिनी फुटली : १२ तासानंतर पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 18:16 IST

जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री फुटली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर १२ तासानंतर या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुमारे १५ लाख लिटर पाणी वाया गेले.

जामखेड : जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री फुटली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर १२ तासानंतर या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुमारे १५ लाख लिटर पाणी वाया गेले.या तलावापासून पाचशे मीटर अंतरावर एका शेतकऱ्याच्या शेतातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जाते. हा शेतकरी रात्री बाराच्या सुमारास जलवाहिनी जाते, त्याठिकाणी जेसीबी मशिनच्या साह्याने काम करीत होता. जेसीबी चालकाला जलवाहिनीचा अंदाज न आल्याने त्याच्याकडून जलवाहिनीवर जेसीबीचे खोरे पडल्याने ती फुटली. दुरूस्तीचे काम होईपर्यंत जामखेड शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अगोदरच चार दिवसाआड शहराला पाणी पुरवठा होत असताना जलवाहिनी फुटल्याने आता हे नवे जलसंकट ओढावले आहे.सोमवारी रात्री बाराच्या जलवाहिनी फुटल्याची माहिती पाणी पुरवठा कर्मचाºयांनी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांना दिली. परंतु रात्रीच्या वेळी काहीच काम करता येत नसल्याने तेथे कोणी गेले नाही. मंगळवारी सकाळी महेश निमोणकर, नगरसेवक मोहन पवार व यानंतर मुख्याधिकारी विनायक औंधकर व कर्मचाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वाया जाणारे पाणी बंद करण्यासाठी व्हॉल्व बंद करणे गरजेचे होते. जुनी पाईपलाईन असल्याने पाणीपुरवठा करणाºया कर्मचाºयांना व्हॉल्व लवकर सापडला नाही. मंगळवार दुपारी एक वाजता व्हॉल्व सापडल्यानंतर तो बंद करून दुरूस्तीसाठी कर्मचारी सरसावले.जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाºया भुतवडा तलावात मंगळवार दुपारपर्यंत २८ .४३ दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा होता. शहराला दररोज पाणी दिले तरी ते आणखी चार महिने पुरणार आहे. परंतु शहरातील अंतर्गत पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जिर्ण झालेली आहे. तसेच भुतवडा तलाव ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत सहा कि. मी. लांबीची जलवाहिनी ४५ वर्षे जुनी व जिर्ण झाली आहे. शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या पाहता या जुन्या जलवाहिनीवरून सर्व भागात पाणी मिळण्यासाठी पाच दिवस लागत आहेत. मंगळवारी दुपारनंतर जलवाहिनी दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. संताजीनगर, मोरेवस्ती, राळेभात गल्ली, शिक्षक कॉलनी, मिलिंदनगर या भागाला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल झाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड