शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडची शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात; २१ लाखाला घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 18:23 IST

नायजेरियन गुन्हेगारांनी जामखेड येथील एका शिक्षिकेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून तिला तब्बल २१ लाख ४१ हजार २७५ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. 

अहमदनगर : आॅनलाईन फसवणुकीत माहिर असलेल्या नायजेरियन गुन्हेगारांनी जामखेड येथील एका शिक्षिकेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून तिला तब्बल २१ लाख ४१ हजार २७५ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत सदर शिक्षिकेने येथील सायबर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि़२७) दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. मार्क हॅरिल्युके याच्यासह एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मार्क हॅरिल्युके असे नाव धारण केलेल्या व्यक्तीने ११ जानेवारी रोजी सदर शिक्षिकेस फेसबुकवरून फ्रेंडरिक्वेस्ट पाठविली़. त्यानंतर शिक्षिकेचा विश्वास संपादन करून तिचा व्हॉटस्अ‍ॅप नंबर घेतला. युनायटेड किंगडम येथे स्थायिक असल्याने डॉ. मार्क याने सदर शिक्षिकेस सांगितले होते. पुढे फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून दोघांचा संवाद सुरू झाला. या संवादातून मैत्री झाली आणि सदर शिक्षिकेने तिच्या कुटुंबाविषयी माहिती शेअर केली़. एक दिवस डॉ. मार्क याने तुमच्या मुलासाठी मी यूके येथून लॅपटॉप आणि मोबाईलचे गिफ्ट पाठवित असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी सदर शिक्षिकेस दिल्ली येथून एका महिलेने फोन केला. तिने दिल्ली विमानतळावरून कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगितले़. ‘तुमच्या नावे यूके येथून एक गिफ्ट आले असून तपासणीदरम्यान त्यात ५० हजार पाउंड स्कॅन झाले आहेत. आपण परदेशातून भारतात काळा पैसा मागितला आहे. त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो़, अशी धमकी दिली. यातून सुटका करून घ्यावयाची असेल तर तुम्हाला वेगवेगळे टॅक्स भरावे लागतील, असे सांगितले़. गुन्हा दाखल होण्याच्या धमकीने घाबरून गेलेली शिक्षिका पैसे भरण्यास तयार झाली. त्यानंतर त्या दिल्लीच्या महिलेने दिलेल्या विविध बँक खात्यावर या शिक्षिकेने २१ लाख ४१ हजार रुपये भरले़. पैसे भरल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे तिच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, राहुल गुंडू, दिगंबर कारखिले, अभिजीत अरकल, उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर, विशाल हुसळे, विशाल अमृते आदींचे पथक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcyber crimeसायबर क्राइमJamkhedजामखेड