शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जामखेड नगरपरिषद : पोटनिवडणूकीसाठी दुपारपर्यंत ५७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:02 IST

नगरपरिषदेच्या प्रभाग १४ च्या पोटनिवडणूकीसाठी चुरशीने मतदान चालू असून एक वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान झाले आहे.

जामखेड - नगरपरिषदेच्या प्रभाग १४ च्या पोटनिवडणूकीसाठी चुरशीने मतदान चालू असून एक वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान झाले आहे. निवडणूकीसाठी भाजप, कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार रिंगणात असून शिवसेना व एक भाजप बंडखोर रिंगणात उतरले असून लढत चौरंगी लढत होत आहे. चारही उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रचार केला असल्याने निकालाचे गणित बदलणार आहे. भाजप पुढे जागा राखणे इतर तीन उमेदवाराचे मोठे आव्हान आहे.           आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. खर्डा चौक व महादेव गल्ली असे दोन बुथ असून मतदार संख्या १४२८ इतकी आहे. शनिवारी पडलेल्या पावसामुळे सकाळी मतदानाचा वेग कमी होता. नऊच्या सुमारास मतदार घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली. दोन्ही बुथवर ठराविक अंतरावर चारही उमेदवाराचे समर्थक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुरवातीला मतदानास निरुत्साह असला तरी त्यानंतर मात्र चुरशीने मतदान होऊ लागले. मतदान घडवून आणण्यासाठी उमेदवाराचे कार्यकर्ते प्रयत्न करत होते. दुपारी दिड वाजेपर्यंत खर्डा चौक उर्दू शाळा बुथवर ४०८ मतदान झाले त्यामध्ये महिला २०५ तर २०३ पुरुषांनी मतदान केले. तर महादेव गल्ली येथील जिल्हा परिषद शाळेतील खोलीतील बुथवर एकूण ४०६ मतदारांनी मतदान केले. १४२८ पैकी ८१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान वेळेपर्यंत ८० टक्के पेक्षा जास्त मतदान होण्याची शक्यता आहे.        विद्यमान उपनगराध्यक्ष फरिदा खान यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग १४ मधील नगरसेवक पदासाठी पोटनिवडणुकीत होत आहे.      निवडणुकीत पाच उमेदवार रिंगणात आहेत. शेख जाकीया आयुब भाजपा, शेख परवीन सिराजोद्दीन काँग्रेस तर शिवसेना तालुका प्रमुख संजय काशिद यांची पत्नी रोहीणी काशिद अपक्ष तसेच बाजार समितीचे संचालक सागर सदाफुले यांच्या मातोश्री मैनाबाई ज्ञानदेव सदाफुले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष गुंदेचा यांच्या पत्नी छाया संतोष गुंदेचा हे निवडणूक रिंगणात आहेत. परंतु शेवटच्या दोन दिवस अगोदर त्यांनी शिवसेना उपक्ष उमेदवार रोहिणी काशीद यांना पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड