शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड दुहेरी हत्याकांडातील आरोपींची तालीम सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 18:48 IST

जामखेड :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाशी संबंधित आरोपींच्या तालमीस जामखेड नगरपालिकेने मंगळवारी सायंकाळी सील ठोकले. जांबवाडी रस्त्यावरील ही वादग्रस्त तालीम ...

ठळक मुद्देजामखेड नगरपालिकेची कारवाईमृतांच्या नातेवाईकांनी केलेली मागणी

जामखेड :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाशी संबंधित आरोपींच्या तालमीस जामखेड नगरपालिकेने मंगळवारी सायंकाळी सील ठोकले. जांबवाडी रस्त्यावरील ही वादग्रस्त तालीम बंद करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी नगरपालिकेकडे केली होती.

२८ एप्रिलला बीड रस्त्यावरील एका हॉटेलसमोर मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याकांडाचा थेट संबंध भुतवडा रस्त्यावरील अमरधामशेजारी असलेल्या या तालमीशी जोडण्यात आला. या तालमीत वास्तव्यास असलेला आरोपी गोविंद गायकवाड याने अल्पवयीन मुलासह इतर साथीदारांच्या मदतीने दुहेरी हत्याकांड केले होते. याच तालमीतून गुंड तयार करण्याचे काम होत असल्याचा आरोप झाल्यानंतर तालमीतून तलवारीदेखील जप्त करण्यात आल्या होत्या. ही तालीम नगरपालिकेने पाडावी अथवा ताब्यात घ्यावी, यासाठी मृतांच्या नातेवाईक व महिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तसेच ३० एप्रिलच्या ग्रामसभेत व शांतता समितीच्या बैठकीत ही तालीम पाडण्याचा ठराव करण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेत नगरपालिकेने १४ मे च्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केला. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी तालमीस सील ठोकण्यात आले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड