चोपडा-लोढा विजयी : निकालाची अधिकृत घोषणाअहमदनगर : अखिल भारतीय जैन श्वेतांबर कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २४ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व २४ जागांवर जय जिनेंद्र ग्रुपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.अखिल भारतीय जैन श्वेतांबर कॉन्फरन्स या नवी दिल्ली येथील शिखर संस्थेसाठीच्या २६ जागांसाठी रविवारी मतदान झाले. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाशिक येथील मोहनलाल चोपडा, चतुर्थ झोन प्रांतीय अध्यक्षपदासाठी अहमदनगर येथील सतीश लोढा, पंचम झोन प्रांतीय अध्यक्षपदासाठी घोडनदी येथील कांतीलाल बोथरा विजयी झाले आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २४ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी मोहनलाल चोपडा, सतीश लोढा यांच्या नेतृत्वाखालील जय जिनेंद्र पॅनेलचे सर्वच्या सर्व २४ उमेदवार सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांची नावे आणि त्यांना देशभरातील केंद्रावर मिळालेली मतं अशी- मनोज सेठिया (अहमदनगर-४६१६),अजित संकलेचा (नाशिक-४५३०),ललित मोदी (नाशिक-४४५१), नंदकिशोर साखला (नाशिक-४४२७),आनंद चोरडिया (पाथर्डी-४३६८), पारसमल दुगड (धुळे-४३३९), कांतीलाल चोपडा (नाशिक-४३१९),जवरीलाल भंडारी (नाशिक-४२६५), भीकचंद डोशी (औरंगाबाद-३९५३), चंदनमल बाफना (संगमनेर-४२०३), प्रकाश सुराणा (मालेगाव-४१८०), प्रवीण खाबिया (नाशिक-४१२९), चंद्रकांत रुणवाल (धुळे-३७२४), दिलीपकुमार टाटिया (सटाणा-४१९९), प्रवीण भंडारी (नारायणगव्हाण-४१९७), रमेश साखला (नाशिक-३९२७), संजय कोठारी (जामखेड-४०८६), सतीश चोपडा (अहमदनगर-४२२७), मदनलाल लोढा (औरंगाबाद-४१७०), मिठालाल कांकरिया (औरंगाबाद-४१०७), शशिकांत पारख (नाशिक-४१३३), सुभाष पगारिया (अहमदनगर-३८१४), वैभव नहार (नेवासा-३७०१), विजय ललवाणी (परळी वैजनाथ-३४८७)अशोक बोरा यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचे अजय बोरा, अनिल कटारिया, पीयूष लुंकड, हरकचंद कांकरिया या चार उमेदवारांनी चांगलीच लढत दिली. चौघांनाही ३ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. सर्व मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी एकत्रित करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर रात्री नऊ वाजता अधिकृत घोषणा करण्यात आली.२४ जागंसाठी ४९ उमेदवार रिंगणात होते. या जागांसाठीची मतमोजणी सोमवारी दुपारपर्यंत सुरू होती. नगर येथील मतमोजणी केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. डी. डी. खाबिया, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सी.ए. किरण भंडारी यांनी काम केले. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोहन बरमेचा, भन्साळी, अॅड. अशोक बोरा, अॅड. प्रदीप भंडारी, पी. के. मेहेर, अभिजित मुनोत यांनी सहकार्य केले. निरीक्षक म्हणून हेमंत जोशी यांनी काम पाहिले. निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहताना कठोर भूमिका घ्यावी लागते. याचा अनेकांना त्रास होणे साहजिक आहे, असे खाबिया यांनी सांगितले.(प्रतिनिधी)१६ उमेदवारांना नगरमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त मतदानअखिल भारतीय जैन श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या निवडणुकीत जय जिनेंद्र ग्रुप पॅनलच्या १६ उमेदवारांना दोन हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. तर परिवर्तन पॅनेलच्या आठ उमेदवारांना दोन हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. त्यामुळे सर्वाधिक मते मिळविणारे उमेदवार हे मोहनलाल चोपडा यांच्या नेतृत्वाखालील जय जिनेंद्र ग्रुपचे उमेदवार आहेत.
जैन कॉन्फरन्सच्या निवडणुकीत जय जिनेंद्र पॅनलचे वर्चस्व
By admin | Updated: May 23, 2016 23:22 IST