शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

मोदींवर टीका करण्यापेक्षा समस्यांवर मार्ग काढा-रामदेव बाबा यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 17:41 IST

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करु नका. यातून मार्ग काढत स्वत: ला सिध्द करा, असे आवाहन योग गुरु रामदेव बाबा यांनी केले. 

संगमनेर : आपल्या देशात आज बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरिबी, महागाई अशा अनेक समस्या आहेत. मात्र केवळ या समस्यांवर विचार करीत बसू नका. या विषयांवरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करु नका. यातून मार्ग काढत स्वत: ला सिध्द करा, असे आवाहन योग गुरु रामदेव बाबा यांनी केले. संगमनेर येथे गीता महोत्सवाला रविवारी दुपारी उत्साहात प्रारंभ झाला. कार्यक्रमास योगगुरू रामदेव बाबा, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती लक्षणीय होती. रामदेव बाबा पुढे म्हणाले, समाजात चांगले नागरिक घडविण्याची क्षमता गीता संस्कारात आहे. त्यामुळे गीता परिवाराचा उपक्रम स्तुत आहे. गीता परिवाराच्या वतीने स्वामी श्री गोविंदगिरी महाराज यांच्या ७१ व्या जन्मवर्षानिमित्त संगमनेर येथे ७१ हजार गीतेचे मुखोद्गत अध्याय त्यांना भेट दिले जाणार आहेत. यानिमित्त गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांनी या गीता महोत्सवाचे नियोजन केले आहे. या महोत्सवात विविध ठिकाणाहून येणारे ८ राज्यातील सुमारे ३० हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. परराज्यातून येणा-या शेकडो विद्यार्थ्यांच्या निवास, जेवण आणि अगदी छोट्या, छोट्या गोष्टींचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.२०१६ साली गीता परिवाराने राष्ट्रीय योग संस्कार महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून योगमहर्षी स्वामी रामदेव महाराज उपस्थित होते. आजही या कार्यक्रमास रामदेव बाबांची उपथिती आहे. रविवारी सकाळपासून गीता महोत्सवात शौर्य प्रात्यक्षिक, योग प्रात्याक्षिक, नृत्य सादरीकरणाने संगमनेरकर मंत्रमुग्ध झाले होते.  

टॅग्स :SangamnerसंगमनेरAhmednagarअहमदनगर