शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

इंडियन सिमलेसचा तिढा कायम

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

अहमदनगर: येथील इंडियन सिमलेस कंपनी व्यवस्थापन व कामगारांतील वादावर शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही़ कंपनी कामगारांच्या कारवाईवर ठाम

अहमदनगर: येथील इंडियन सिमलेस कंपनी व्यवस्थापन व कामगारांतील वादावर शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही़ कंपनी कामगारांच्या कारवाईवर ठाम असून, संघटनेने त्यास विरोध दर्शविला आहे़ त्यामुळे पुन्हा शनिवारी बैठक होणार असल्याचे कामगार कार्यालयाकडून सांगण्यात आले़ त्यामुळे कामगारांचा जीव टांगणीला लागला आहे़इंडियन सिमेलस कंपनीच्या आवारात कामाच्यावेळेत कामगारांच्या विविध मागण्यांबाबत संघटनेने बैठक घेतली़ बैठकीस कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते़ त्यामुळे व्यवस्थापनाने दुसऱ्या दिवशी बुधवारी विद्युत पुरवठा बंद करून उत्पादन बंद केले़ तशी सूचना त्यांनी प्रवेशव्दारावर लावली़ परंतु तरीदेखील कामगारांनी काम करण्याची तयारी दर्शविली होती़ मात्र कंपनीने उत्पादनास सुरुवात न करता कामगारांना पोलीस बंदोबस्तात बाहेर काढले़ त्यामुळे हा वाद चांगलाच चिघळला़ संघटनेने कंपनीच्याविरोधात कामगार आयुक्तांकडे धाव घेतली़ तर कंपनीनेही उत्पादन बंद करत असल्याचे कामगार कार्यालयास कळविले असून कंपनीत दमदाटी केल्याने १२ कामगारांना निलंबित केले आहे़ त्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे़ याविषयी झालेल्या तीनही बैठकीत तोडगा निघाला नाही. या बैठकीस कंपनी व्यवस्थापनाचे पुणे येथील भामरे उपस्थित होते़ त्यांनी १२ कामगारांवरील कारवाई मागे घेऊन उत्पादन सुरू करण्यात येईल़ मात्र निलंबित कामगारांची चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशी अट संघटनेला घातली़ परंतु कामगारांची चौकशी न करता त्यांना कामावर हजर करून घ्या आणि उत्पादन सुरू करा,अशी मागणी यावेळी संघटनेने केली़ (प्रतिनिधी)कंपनीचे प्रतिनिधी नॉटरिचेबलइंडियन सिमलेस कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते़ कंपनीची बाजू त्यांनी कामगार आयुक्तांसमोर मांडली़ परंतु तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली़ याविषयी कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र प्रतिसाद मिळाला नाही़ त्यामुळे याविषयी कंपनीने काय भूमिका घेतली, ते समजू शकले नाही़ दिवसभरात संघटना व कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत दोन बैठका झाल्या़ दोन्ही बैठकांत तोडगा निघाला नाही़ कामगारांवरील कारवाईविषयीच चर्चा झाली़ उत्पादन सुरू करून इतर कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले़ मात्र कंपनीने त्यास विरोध दर्शविला असून, संघटनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे़ उद्या शनिवारी याविषयी बैठक होणार असून, या बैठकीतून तोडगा निघेल,अशी अपेक्षा आहे़- बाळासाहेब वाघ, सहाय्यक आयुक्त, कामगार कार्यालय