नेवासा : शिर्डी व कोल्हापूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूरचे श्री शनैश्वर देवस्थान आता राज्य शासनाच्या ताब्यात गेले आहे. याबाबत आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकित निर्णय घेण्यात आला. देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासह भक्तांसाठी उत्तम सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार असल्याचेही बैठकित जाहीर करण्यात आले.या निर्णयामुळे शनैश्वर देवस्थानच्या कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष व विश्वस्तांची निवड सरकारकडून होणार आहे. १९६३ सालापासून शिंगणापूरची अध्यक्षनिवडीची परंपरा मोडित निघणार आहे.
शनी शिंगणापूरसाठी राज्य सरकार बनवणार स्वतंत्र कायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:13 IST