शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वाहतूक खर्चात वाढ; तोटा वाढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:51 IST

जिल्ह्यातील साखर उद्योगासाठी चालू हंगाम अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. सरासरी अवघ्या ९० दिवसांचे गाळप करताना कारखान्यांची दमछाक झाली आहे. कार्यक्षेत्रात ऊस नसल्याने अनेक कारखान्यांना अडीचशे किलोमीटर अंतरावरील पंढरपूर व नंदूरबार येथून गाळपासाठी ऊस आणावा लागला. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होऊन आर्थिक फटका बसला.

शिवाजी पवार ।  श्रीरामपूर : जिल्ह्यातील साखर उद्योगासाठी चालू हंगाम अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. सरासरी अवघ्या ९० दिवसांचे गाळप करताना कारखान्यांची दमछाक झाली आहे. कार्यक्षेत्रात ऊस नसल्याने अनेक कारखान्यांना अडीचशे किलोमीटर अंतरावरील पंढरपूर व नंदूरबार येथून गाळपासाठी ऊस आणावा लागला. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होऊन आर्थिक फटका बसला.साखर कारखानदारीसाठी १८० दिवसांचा हंगाम हा आर्थिकदृष्ट्या उत्तम मानला जातो. मात्र नगर जिल्ह्यात उसाच्या कमतरतेमुळे हंगाम सरासरी ९० दिवस चालला. जिल्ह्यातील गणेश, राहुरी, साईकृपा, श्रीगोंदे, कुकडी व पारनेर हे साखर कारखाने बंद ठेवण्याचा तेथील व्यवस्थापनाने निर्णय घेतला होता. खासगी व सहकारी अशा १३ कारखान्यांचे धुराडे पेटले होते. त्यातील ज्ञानेश्वर, मुळा व वृद्धेश्वर साखर कारखान्यांचे गाळप फेब्रुवारीच्या प्रारंभी बंद झाले. सध्या दहा कारखान्यांचा हंगाम सुरू असून मार्चच्या पंधरवाड्यापर्यंत सर्वच धुराडे बंद होतील.जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अल्प प्रमाणात ऊस उपलब्ध होता. त्यामुळे सर्वच कारखान्यांना ऊस मिळविण्यासाठी कसरत करावी लागली. अशोक साखर कारखान्याने यंदा धुळे जिल्ह्यातून ऊस उपलब्ध केला. याशिवाय संगमनेर, प्रवरा या कारखान्यांना जिल्ह्याबाहेर पडावे लागले. पंढरपूर, करमाळा, शिरपूर, जळगाव, जालना, नंदूरबार या भागातून त्यांनी ऊस आणला. त्यामुळे वाहतूक खर्च व पर्यायाने उत्पादन खर्च वाढला आहे. कारखाने कमी क्षमतेने चालवावे लागले. त्यातच साखरेचे दर वाढलेले नसल्याने तोट्यात वाढ होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. कारखान्यांच्या अपुºया हंगामामुळे सहवीजनिर्मिती प्रकल्प, इथेनॉल निर्मितीसह व इतर उपपदार्थ निर्मितीवर विपरित परिणाम होणार आहे. 

नगर जिल्ह्यात यंदा ४७ ते ५० लाख टन उसाचे गाळप होईल असा अंदाज आहे. साखर उतारा सरासरी १० टक्क्यांच्या आसपास राहील. सर्वच कारखान्यांसाठी हा कसोटीचा हंगाम ठरला आहे. पूर्ण क्षमतेने कारखाने चालले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढणार आहेत, असे अशोक सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने