शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

शीतपेयांमध्ये अशुद्ध बर्फाचा खडा

By admin | Updated: May 19, 2016 00:02 IST

अरुण वाघमोडे, अहमदनगर ‘मे हिट’च्या वाढत्या तडाख्यात ग्राहकांकडून थंडपेयांना मोठी मागणी वाढली आहे़

अरुण वाघमोडे, अहमदनगर‘मे हिट’च्या वाढत्या तडाख्यात ग्राहकांकडून थंडपेयांना मोठी मागणी वाढली आहे़ नगर शहरातील रस्त्यांसह चौकाचौकात विक्रेत्यांनी आईसक्रीमसह शीतपेयांची दुकाने थाटली आहेत़ यातील बहुतांशी शीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ हा अशुद्ध पाण्यापासून बनविलेला असून ही पेये आरोग्यासाठी घातक ठरत आहेत़ अन्न, औषध प्रशासनाची परवानगी असलेला एकही कारखाना सध्या नगर शहरात नाही, तरी सकाळी सात वाजता शहरातील शीतपेये विक्रेत्यांना सहज बर्फ उपलब्ध होत आहे़ स्थानिक ठिकाणी मिळेल त्या पाण्यापासून बर्फ बनविणाऱ्यांची शहरात मोठी संख्या आहे़ उन्हाळ्यामुळे बर्फाला मोठी मागणी असून, शीतपेये विक्रेत्यांना हा अशुद्ध बर्फ विकला जात आहे़ बर्फाच्या कारखान्यासाठी अन्न, औषध प्रशासनाची परवानगी लागते़ तसेच अन्नपदार्थांमध्ये वापरण्यात येणारा बर्फ बनविताना तो शुद्ध पाण्यापासून तयार करणे बंधनकारक आहे़ मात्र, हा बर्फ अशुद्ध पाण्यापासून बनवितात़ शहरात उसाचा रस, ताक, लस्सी, सोडा, ज्यूस, सरबत व आईसक्रीमच्या ठिकठिकाणी हातगाड्या लागलेल्या आहेत़ या सर्वच विक्रेत्यांकडे दिवसभर ग्राहकांची मोठी वर्दळ असते़ या ठिकाणी दिले जाणारे थंड पदार्थ मात्र, आरोग्याला घातक ठरणारे आहेत़ नगर शहरात अन्न, औषध प्रशासनाची परवानगी असलेला एकही बर्फाचा कारखाना नाही़ शहरात खराब पाण्यापासून तयार केलेला बर्फ विकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे़ अशुद्ध बर्फ विक्री करताना कुणी आढळून आले तर कडक कारवाई करण्यात येईल.-बालू ठाकूर, सहायक आयुक्त,अन्न,औषध प्रशासन