अहमदनगर : येथील नेप्ती रोडवरील इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेच्या आय. एम. ए. भवनातील दुसऱ्या टप्प्यातील डॉ. एस. एस. दीपक, ज्योती दीपक परिवाराच्या योगदानातून उभारलेल्या ओपन थिएटरचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण व फीत कापून झाले. यावेळी कोरोना काळात डॉक्टरांच्या संघटनेच्या कार्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी गौरव केला.
रविवारी झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी आय. एम.ए.चे शाखा अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे खजिनदार डॉ. रवी वानखेडकर, राज्याचे मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष शिवकुमार उत्तुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, डॉ. रवींद्र साताळकर, डॉ. निसार शेख, डॉ. किरण दीपक, डॉ. वैशाली किरण, बिल्डिंग कमिटी चेअरमन डॉ. रवींद्र सोमाणी, सचिव डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. अनिल पाचनेकर, डॉ. पंकज बंदरकर, दीपाली भोसले, डॉ. राजीव अग्रवाल, डॉ. सागर झावरे, डॉ. प्रकाश गरुड, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. अमित करडे, खजिनदार डॉ. गणेश बडे, डॉ. प्रकाश व सुधा कांकरिया उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी प्रास्ताविक केले. कोरोनाच्या महामारीत मृत्युमुखी पडलेल्या अनेक डॉक्टर्स व संबंधित सहकाऱ्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, राज्यातील, परराज्यातील, परदेशातील वैद्यकीय तज्ज्ञांना आमंत्रित करुन वैद्यकीय क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाबद्दल, मशिनरी विषयक परिसंवादाचे येथे आयोजन व्हावे. त्याचा नवोदितांच्या उत्कर्षासाठी फायदा होईल. नगरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्य हे वाखाणण्याजोगे आहे. कोरोना महामारीच्या अतिशय कठीण काळात देखील प्रशासनास सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सहकार्य केल्याने अनेक ताण -तणाव कमी झाले.
--------------
फोटो- ०९ आयएमए
नगरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रांगणातील थिएटरचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल आठरे, डॉ. सचिन वहाडणे, डॉ. रवी वानखेडकर, शिवकुमार उत्तुरे, डॉ. किरण दीपक.