शहरं
Join us  
Trending Stories
1
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
2
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
3
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
4
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
5
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
6
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
7
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
8
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
9
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
10
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
11
AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!
12
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
13
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
14
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...
15
मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
TCS कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! कंपनीने दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना दिलं 'वेतनवाढी'चं गिफ्ट
17
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
18
'हार्ले-डेव्हिडसन'बाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा; टॅरिफ नाही, या कारणासाठी भारतातून कंपनी बाहेर गेली
19
'पैसे बचाओ' पॉलिसी! ९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये काय घडतंय?
20
Ola Electric च्या शेअरनं पकडला तुफान 'स्पीड'; ६ दिवसांत ४२% ची वाढ, गुंतवणूकदार मालामाल

शस्त्रक्रियेची अपुरी सुविधा

By admin | Updated: June 2, 2016 23:07 IST

विनोद गोळे, पारनेर पारनेर शहरासह परिसरातील सामान्य लोकांना जीवनदायी ठरणाऱ्या पारनेर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची संख्या अपुरी आहे.

विनोद गोळे, पारनेरपारनेर शहरासह परिसरातील सामान्य लोकांना जीवनदायी ठरणाऱ्या पारनेर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची संख्या अपुरी आहे. सुसज्ज इमारत आहे पण छत गळके असल्याने पावसाळ्यात रूग्णालयातच पाणवठे तयार होतात. प्राथमिक तपासणीसाठी रूग्णांची संख्या चांगली आहे पण शस्त्रक्रियेची सुविधा मात्र अपुरी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत या ग्रामीण रूग्णालयाला संजीवनी देणार का, हाच खरा प्रश्न आहे़पारनेर-सुपा मार्गावर पारनेर ग्रामीण रूग्णालयाची सुसज्ज इमारत शासनाने उभारली आहे. सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. उंदरे, डॉ.भोंडवे काम पाहतात. पारनेर शहरासह गटेवाडी, पानोली, राळेगणसिध्दी, जातेगाव, घाणेगाव, वडनेर हवेली, चिंचोली, म्हसणे, बाबुर्डी, हंगा, सुपा, लोणी हवेली, डिकसळ, करंदी यासह शेजारील वाड्या-वस्त्या या रुग्णालयाशी संलग्न आहे. या सुसज्ज रूग्णालयात मोठी स्पेशल रूम, महिलांसाठी स्वतंत्र रूम, रूग्ण तपासणी केंद्र ,जनरल वॉर्ड यासह सुविधा आहेत. परंतु पावसाळ्यात मात्र छत गळत असल्याने तळ्याचे स्वरूप येते. एक वैद्यकीय अधिकारी भूलतज्ञ म्हणून नेमणूक झाल्यास मोठ्या शस्त्रक्रिया येथे होऊ शकतात. यासाठी आॅपरेशन थिएटरमध्ये सुसज्जता आणणे गरजेचे आहे. एक्स-रे तंत्रज्ञ नसल्याने मशीन धुळखात पडून आहे. महिलांची प्रसूती येथे चांगल्या प्रकारे होते. तसेच बुधवार व शनिवार डोळ्यांची शिबिरे होऊन उपचार होतात, गरोदर माता व बालकांना डोस दिले जातात. ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पाण्याविना रूग्णांना अन्यत्र भटकंती करावी लागते. अपघाती किंवा अन्य प्रकारात मृत्यू झाल्यास शवविच्छेदनासाठी कायमस्वरूपी माणूस नाही. त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाची हेळसांड होेते. राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत शुक्रवारी पारनेर ग्रामीण रूग्णालयाला भेट देणार आहेत. त्यांच्या भेटीतून सामान्य लोकांसाठी उपयोगी पडणाऱ्या ग्रामीण रूग्णालयाला संजीवनी देणार का? याची उत्सुकता पारनेरकरांना आहे.