शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरमधे ट्रॅक्टर उलटून एक जण जागीच ठार; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 14:51 IST

ट्रॅक्टरखाली दबून योगेश बर्डे याचा जागीच मृत्यू झाला.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील कर्जुले पठार येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बाजूच्या रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून एकजण जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.  योगेश विलास बर्डे (वय 22, रा. नायगाव थेऊर, पुणे) हा कर्जुले पठार येथील नातेवाईकांकडे आलेला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नाशिकच्या दिशेने ट्रॅक्टरमधून वरूडी फाट्याकडे येत होता. त्यानंतर ट्रॅक्टर गावाच्या पुढे आल्यानंतर थेट पलटी झाला. 

ट्रॅक्टरखाली दबून योगेश बर्डे याचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघात झाल्याचे समजताच परिसरातील कर्जुले पठारचे सरपंच रवींद्र भोर, उपसरपंच तुकाराम आगलावे, अ‍ॅड. सुभाष गोडसे, सुखदेव बोंबले, सचिन पडवळ आदिंनी धाव घेऊन त्यास बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून संगमनेरला हलविले. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, मनेष शिंदे, योगीराज सोनवणे, उमेश गव्हाणे, नंदू बर्डे, अरविंद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीला पाचारण करुन अपघातग्रस्त ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला घेतला. या घटनेची पोलिसांनी नोंद केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात