शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत बेईमानांना शिक्षा नाही, इमानदारांची कदर नाही; राष्ट्रवादीच्या माजी प्रदेश उपाध्यक्षाची टीका

By साहेबराव नरसाळे | Updated: June 16, 2023 18:09 IST

पक्षाला प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले व नुकतेच बीआरएस पक्षात गेलेले घनश्याम शेलार यांनी केली.

अहमदनगर - राष्ट्रवादी पक्षात गेली २३ वर्ष आपण प्रामाणिकपणे काम केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जे कृषीविषयक धोरण आहे, अगदी त्याच्या उलट धोरण पक्षातील लोकं राबवितात. पक्षात बेईमान नेत्यांचा भरणा होत असून, सध्या पक्ष राजकीयदृष्ट्या अस्थिर झाला आहे. पक्षातील बेईमान लोकांच्या अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, पक्षा त्यांच्यावर काहीही कार्यवाही करीत नाही. तसेच पक्षाला प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले व नुकतेच बीआरएस पक्षात गेलेले घनश्याम शेलार यांनी केली.

शेलार यांनी शुक्रवारी (दि. १६) येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, १४ जून रोजी आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडलो आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे शेतकऱ्यांविषयी अत्यंत स्पष्ट धोरण होते. परंतु पक्षातील लोकं अगदी त्याविरोधात भूमिका घेतात. अनेक कारखानदार नेते शेतकऱ्यांची देणी देत नाहीत. एफआरपीप्रमाणे उस उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंट देत नाहीत. पक्षातील अशा नेत्यांची व पक्षविरोधी भूमिका घेऊन विरोधी पक्षांना निवडणुकीत मदत करणाऱ्यांची आपण अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. पण उपयोग झाला नाही.

राष्ट्रवादी हा शेतकऱ्यांचा कल्याणकारी पक्ष होईल, अशा अपेक्षेने आपण अनेक वर्ष मृगजळाच्या मागे धावत होतो. पण आता वास्तविक आशेचा किरण बीआरएसच्या रुपाने दिसला आहे. बीआरएसने तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना सुखी जीवन दिले आहे. महाराष्ट्रात व देशातही हा बीआरएस पॅटर्न लागू व्हावा, यासाठी आपण बीआरएस पक्षात दाखल झालेलो आहे. पक्षाची आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागा लढण्यासाठी पक्षाची तयारी सुरु आहे, असेही शेलार म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस