शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

लोकमतच्या वृत्तानंतर भिंगार कॅम्प हद्दीत दारू, मटका अड्ड्यांवर छापे; ११ आरोपींवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 12:29 IST

भिंगार शहरासह आलमगीर, दरेवाडी, कापूरवाडी परिसरात खुलेआम सुरू असलेला दारू व मटका अड्ड्यांबाबत ‘लोकमत’ने ४ नोव्हेंबर रोजी ‘भिंगारमध्ये खुलेआम मटका, दारूअड्डे सुरू’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर कॅम्प पोलिसांनी अवैध व्यवसायावर कारवाईस प्रारंभ केला.

अहमदनगर : भिंगार शहरासह परिसरात सुरू असलेल्या दारू व मटका अड्ड्यांचे स्टिंग आॅपरेशन करत या अवैध व्यवसायाचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत तब्बल ११ ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. यामध्ये ११ आरोपींवर गुन्हा दाखल करत ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.भिंगार शहरासह आलमगीर, दरेवाडी, कापूरवाडी परिसरात खुलेआम सुरू असलेला दारू व मटका अड्ड्यांबाबत ‘लोकमत’ने ४ नोव्हेंबर रोजी ‘भिंगारमध्ये खुलेआम मटका, दारूअड्डे सुरू’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर कॅम्प पोलिसांनी अवैध व्यवसायावर कारवाईस प्रारंभ केला.पोलिसांनी पाच दिवसांत भिंगार येथील यशवंतनगर येथे छापा टाकून अवैध विक्री होत असलेली २ हजार ४९६ रुपयांची देशी दारू जप्त करून सुनील सत्यवान नवगिरे यांच्यावर गुन्हा दाखल केला़ दरेवाडी येथे छापा टाकून २० लिटर दारू, दारू बनविण्यासाठी वापरला जाणारा गूळ व एक मोटारसायकल असा २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ या कारवाईत बाळासाहेब अशोक बर्डे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. यशवंतनगर येथील कारवाईत २ हजार रुपयांची गावठी हातभट्टी जप्त करण्यात आली. या प्रकरणी जावेद पटेल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी गौतमनगर येथे छापा टाकून १ हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. यामध्ये गोरख मारुती भिंगारदिवे याच्यावर कारवाई करण्यात आली. बुरूडगाव रोड येथे छापा टाकून १५०० रुपयांची दारू जप्त करत गोरख काशिनाथ भुजबळ याच्यावर कारवाई करण्यात आली़ दरेवाडी येथे २ हजारांची गावठी दारू जप्त करून प्रशांत प्रमोद बोडखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला़ कापूरवाडी येथे २ हजार रुपयांची दारू जप्त करत रंजना नामदेव ब्राह्मणे हिच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला़ वंजारवाडी येथे छापा टाकून २ हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली़ याप्रकरणी रावसाहेब चिमाजी अळकुटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भिंगारमध्ये ४ व ६ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी दोन ठिकाणी मटका अड्ड्यांवर छापा टाकून ७००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ यामध्ये अजित पठाण व संजय खताडे यांच्यावर कारवाई केली.

घातक गावठी हातभट्टीची निर्मिती

भिंगार शहरासह परिसरातील गावांत अनेक ठिकाणी काळा गूळ, नवसागर व केमिकल वापरून गावठी हातभट्टी दारू तयार करून विकली जाते. ही दारू स्वस्त मिळत असल्याने अनेक जण या दारूच्या आहारी गेले आहेत. बनावट असलेली ही दारू शरीरासाठी अतिशय घातक आहे. पांगरमलप्रकरण अशाच बनावट दारूमुळे घडले आहे़ भिंगार कॅम्प पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईत किती दिवस सातत्य राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस