शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

आघाडी सरकारचे ‘पाण्या’कडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 15, 2016 00:56 IST

अहमदनगर : पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार हे गाव केवळ आदर्श गाव नसून एक चालते बोलते विद्यापीठच आहे

अहमदनगर : पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार हे गाव केवळ आदर्श गाव नसून एक चालते बोलते विद्यापीठच आहे. या गावातून आतापर्यंत अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी विविध कामाचा आदर्श घेवून गेलेले आहेत. जे काम हिवरेबाजारने केले त्याचे अनुकरण ‘आघाडी सरकार’ करू शकले नाही. आघाडी सरकारचे जलसंधारण आणि पाणी या विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मंत्री मुनगंटीवार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी आदर्श गाव हिवरेबाजारला भेट दिली. यावेळी मंत्री मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील ५० सरपंच, ग्रामसेवक यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे आणि उपवनसरंक्षक ए. लक्ष्मी यांनी सर्वांचे स्वागत केले. गावातील शिवार फे री, गवत कापणी शुभारंभ, वनधन-जनधन योजनेचा शुभारंभ, जनावरांचा गोठा भेट यानंतर मंत्री मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, राज्य सरकारने हिवरेबाजार प्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गतवर्षी अर्थसंकल्पात १ हजार ७२ कोटी रुपये घोषित केले. चालू वर्षी ७ हजार ८५० कोटी रुपये मंजूर केले असून पुढील तीन वर्षात प्रत्येकी ५ हजार कोटी प्रमाणे १५ हजार कोटी शेती, पाणी, जलसंधारण कामासाठी नाबार्डकडून कर्ज घेतले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी गावातील लोकांनी पुढाकार घेतल्यास गाव हिवरेबाजारप्रमाणे आदर्श होईल. हिवरेबाजार गावाच्या कामातून बोध घेण्यासारखे खूप आहे. या गावाचे नाव देशाच्या नकाशावर कोरले गेले आहे. हिवरेबाजारचा आदर्श राज्यातील गावांनी घेतल्यास महाराष्ट्राची जीवनशैली बदलेल असा आशावाद व्यक्त केला. जलसंधारण मंत्री शिंदे यांनी मंत्री झाल्यावर गावकऱ्यांना कार्यक्रम घेण्यासाठी मंत्र्यांची तारीख घ्यावी लागते. मात्र, हिवरेबाजार गावाची तारीख घेण्याची वेळ आमच्यावर आली. माणसाची मानसिकता बदलल्याशिवाय सुधारणा होत नाही. (प्रतिनिधी) मंत्री मुनगंटीवार, शिंदे आणि लोणीकर यांनी हिवरेबाजार गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्या ठिकाणी अंगणवाडीतील मुले होती. या मुलांसाठी केळी आणि अंडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या ठिकाणी असणारी अंडी पाहून मंत्री शिंदे यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार हे शाकाहारी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर त्या ठिकाणी असणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांनी हजरजबाबीपणे शाकाहारी मंत्र्यांच्या हस्ते केळी वाटप करता येतील, असे सुचवले. त्यावर पुन्हा एकच हशा पिकला. अखेर मुनगंटीवार यांनी स्वत:च्या हाताने केळी वाटप केले. ४त्यानंतर मंत्र्यांचा ताफा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेकडे वळाला. त्या ठिकाणी दुसरीच्या वर्गातील मुलांकडून कविता, गाणी म्हणून घेतली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून मंत्रीही अवाक झाले. शाळेत ना नफा ना तोटावर विद्यार्थी शालेय साहित्य विक्री करत असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या उपक्रमाचे मंत्र्यांनी कौतुक केले. हिवरेबाजारमध्ये एकही दारिद्रय रेषेखाली कुटुंब नसल्याचे पवार यांनी सांगताच मंत्री मुनगंटीवार त्यांच्या मतदारसंघातील सरपंचांना म्हणाले, आपल्याकडे मंत्री झाल्यानंतरही दारिद्र्य रेषेत नाव ठेवण्याचा आग्रह धरण्यात येतो. यावर एकच हशा पिकला. सर्वांनी हिवरे बाजारची शिवार फेरी केली. राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या ईबीसी सवलतीच्या निर्णयावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना सवलती देण्यात येणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर एकदम अतिरिक्त भार पडणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या सवलतीचा हुशार, होतकरू आणि आर्थिक कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले.