शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

खर्चात तफावत आढळली तर उमेदवार अपात्र : सहारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:08 IST

आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी नेमलेल्या पथकांनी आणि खर्चनियंत्रण पथकांनी उमेदवारांकडून येत असलेल्या माहितीची खातरजमा करावी.

अहमदनगर : आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी नेमलेल्या पथकांनी आणि खर्चनियंत्रण पथकांनी उमेदवारांकडून येत असलेल्या माहितीची खातरजमा करावी. सोशल मीडियावरील प्रचारावरही यंत्रणेचा वॉच असेल. उमेदवारांनी दैनंदिन खर्च ‘ट्रू व्होटर अ‍ॅप’द्वारेच सादर करावा. तो तसा केला नाही किंवा मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्याचे सिद्ध झाले तर उमेदवार अपात्र होईल, असा इशारा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिला.महापालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी सहारिया शुक्रवारी नगर दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या निवडणूक अधिकाºयांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सर्व तयारी केली असून अधिकाधिक मतदान होण्यासाठी मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांना मतदान केंद्र आणि मतदार यादीतील त्यांच्या नावाबाबत खातरजमा करण्यासाठी आणि उमेदवारांना त्यांच्या दैनंदिन खर्चाची माहिती भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ट्रू व्होटर अ‍ॅप तयार केले आहे. उमेदवारांना त्यावरच त्यांचा निवडणूक खर्च भरुन देणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर उमेदवार अपात्र करू, असा इशाराच त्यांनी दिला.यावेळी जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, राज्य निवडणूक आयोगाचे सहसचिव झेंडे, निवडणूक निरीक्षक नंदकुमार बेडसे, लक्ष्मण राऊत यांच्यासह राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.एकूण प्रभाग, मतदानकेंद्रांची संख्या, आदर्श मतदान केंद्रे उभारण्यासाठीची झालेली कार्यवाही, रात्रीची गस्त, संशयास्पद बँक व्यवहारांवर लक्ष आणि त्यावर कार्यवाही, दारुविक्री आणि विनापरवाना दारु दुकाने उघडी राहण्याच्या घटनांबाबत दक्ष राहण्याच्या आणि अशा प्रकारांवर कडक कार्यवाहीच्या सूचना सहारिया यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.निवडणूक कालावधीमध्ये महानगरपालिका हद्दीत कोणताही अनुचित प्रकार सुरु असेल, तर जागरुक नागरिक, स्वयंसेवी संस्था त्याची माहिती कॉप (सिटीझन आॅन पॅट्रोल) या अ‍ॅपवर देऊ शकतात. तात्काळ ती माहिती त्या प्रभागातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस यंत्रणेकडे जाऊन संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल. उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत भरलेल्या शपथपत्राबाबतची माहिती संबंधित प्रभागातील नागरिकांना कळावी, यासाठी ती ठिकठिकाणी दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.अवैध आणि संशयास्पदरित्या पैशांची वाहतूक, व्यवहार यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आयकर आणि विक्रीकर अधिकाºयांवर आहे. त्यांनी व्यापक प्रमाणात ही मोहीम हाती घ्यावी. कोणत्याही प्रकारे असे व्यवहार होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आणि खासकरुन शहरातील बँका, पतसंस्था, सहकारी संस्थांतील व्यवहारांवर लक्ष ठेवावे. मतदारांना प्रलोभन दाखविण्याच्या कोणत्याही घटनांवर तात्काळ कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.सोशल मीडियावरील प्रचारावर पोलिसांच्या सायबर क्राईम बँ्रचची नजर असेल. एखादा संदेश कोठून तयार झाला व तो कोणी प्रसारित केला, किती ग्रुपवर, किती सोशल साईटवर गेला याचा हिशोब ठेवून तोही खर्चात धरला जाईल, असेही यावेळी अधिकाºयांनी स्पष्ट केले.४१ केंद्र अतिसंवेदनशीलमनपा निवडणुकीसाठी २ लाख ५६ हजार ७१९ मतदार आहेत. एकूण ३३७ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यातील १३४ केंद्रे संवेदनशील, तर ४१ केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. ६ निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २ हजार कर्मचारी निवडणुकीचे कामकाज पाहणार असून, निवडणुकीसाठी २ हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल.दानवेंविरूद्धच्या तक्रारीची दखलआचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी पथकाकडे दाखल झाल्या आहेत. त्या सर्वांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरूद्ध दाखल आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली, या पत्रकारांच्या प्रश्नावर सहारिया यांनी सांगितले की, मनपा आयुक्तांनी तक्रारींचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवावा, त्याची शहानिशा करून नियमाप्रमाणे कारवाई करू.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका