शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आयकॉन पब्लिक स्कूलने अडविला जिल्हाधिका-यांचा ताफा : गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 10:40 IST

महापालिका निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी येथील आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये जागेची पाहणी करण्यासाठी गेलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी येथील आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये जागेची पाहणी करण्यासाठी गेलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व त्यांच्यासोबत असलेल्या अधिका-यांना प्रवेशद्वारावरच अडवून अरेरावी करण्यात आल्याची धक्कादायक बाब घडली़ बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी महापालिकेचे उपायुक्त प्रदीप पठारे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी आयकॉन पब्लिक स्कूलचा डायरेक्टर राणा (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ९ डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानासाठी मतदान केंद्र निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुुरू आहे. सुविधायुक्त व जवळच्या शाळांमध्ये मतदान केंद्र उपलब्ध होईल का याची सध्या पाहणी सुरू आहे.  बुधवारी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्यासह उपायुक्त प्रदिप पठारे, प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के, उपअभियंता गोविंद बल्लाळ हे दुपारी बारा वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनरोडवरील मल्हार चौक परिसरात असलेल्या आयकॉन पब्लिक स्कूल येथे गेले. प्रवेशद्वारावर अधिका-यांनी सुरक्षा रक्षकांना जिल्हाधिकारी शाळेची पाहणी करण्यासाठी आले असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकारी शाळेत जात असताना तेथे उपस्थित असलेल्या राणा नावाच्या व्यक्तीने अधिकाºयांना अडविले. निवडणूक कामासाठी आलो असल्याचे अधिका-यांनी राणा याला सांगितले तरी त्याने ‘परवानगी न घेता तुम्ही शाळेच्या आवारात कसा प्रवेश केला’ असे म्हणून हुज्जत घालत थेट जिल्हाधिकारी यांच्यासह अधिका-यांना अरेरावी केली. तसेच शाळेच्या खोल्या पाहण्यासही मज्जाव केला़ या प्रकारानंतर जिल्हाधिकारी व त्यांचे पथक शाळेची पाहणी न करताच परतले़ पोलिसांनी राणा याच्या विरोधात कलम १८६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका