शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

मैं खून देना चाहता हूँ... क्या मेरा खून ले सकते हो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 11:42 IST

सुदाम देशमुख अहमदनगर : ‘मैं खून देना चाहता हूँ... क्या मेरा खून ले सकते हो....अभि लेंगे...’हे आहेत माजी पंतप्रधान ...

सुदाम देशमुखअहमदनगर : ‘मैं खून देना चाहता हूँ... क्या मेरा खून ले सकते हो....अभि लेंगे...’हे आहेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नगर येथील नगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या उद्घाटनाच्या वेळचे उद्गार! डॉक्टरांनी ‘नही’ म्हटल्यानंतर वाजपेयी स्मित हसले आणि म्हणाले, ‘हमारी उमर हो गयी है’! ही घटना आहे २४ एप्रिल १९८६ या दिवशीची!शहर जिल्हा भाजपचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी वाजपेयी यांच्या आठवणी ‘लोकमत’समोर उलगडल्या. तत्कालीन नगरपालिकेचे अध्यक्ष होते, स्व. शंकरराव घुले आणि उपनगराध्यक्ष होते दिलीप गांधी. महापालिकेत पुलोद आघाडीची सत्ता होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या गौरवार्थ नगरला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच दिवशी तत्कालीन नगरपालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या रक्तपेढीचे उदघाटन वाजपेयी यांच्या हस्ते झाले. रक्तपेढीचे उदघाटनाच्या वेळी वाजपेयी यांनी डॉक्टरांना रक्त घेण्याची विनंती केली होती. मात्र त्यावेळी वाजपेयी यांचे वय ६१ वर्षाचे होते. त्यामुळे डॉक्टर त्यांचे रक्त घेऊ शकत नव्हते. रक्त देता येत नाही, अशी खंत त्यावेळी वाजपेयी यांनी डॉक्टरांना बोलून दाखविली. त्यांच्या या बोलण्यातूनवाजपेयी यांची राष्ट्रभक्ती डॉक्टरांनी अनुभवली.रक्तपेढीच्या उदघाटन कार्यक्रमानंतर वाजपेयी हे भाजपचे कार्यकर्ते दामोधर बठेजा यांच्या तारकपूर येथील दोन खोल्यांच्या घरी जेवणासाठी गेले. तिथे बठेजा यांनी त्यांच्यासाठी मिष्ठान्न भोजन दिले होते. मेरे लिए इतना मिष्ठान्न क्यों बनाया, असे वाजपेयी त्यावेळी बठेजा यांना म्हणाले. मात्र माझ्या घरी भोजनाचे आयोजन व्हावे, यासाठी दहा बैठका घेतल्या. त्यानंतर भोजनाचे ठिकाण निश्चित झाले. त्यामुळे एवढे सगळे केले,असे बठेजा यांनी सांगताच त्यांनी बठेजा यांच्या पाठीवर हात ठेवला. यावेळी बठेजा यांनी त्यांना जिलेबी भरवली. मात्र जेवणाऐवजी त्यांचे सगळे लक्ष सभेकडे होते. सायंकाळी सात वाजता वाडिया पार्कच्या मैदानावर सभा होती. त्यांचे प्रखर विचार ऐकण्यासाठी एक लाख लोक सभेला हजर होते. ती सभा नगरमध्ये ऐतिहासिक होती, असे खा. गांधी म्हणाले.शंकरराव घुले से बहोत लगाव है...१९८६ मध्ये तत्कालीन नगरपालिकेत शरद पवार यांच्या पुलोद आघाडीची सत्ता होती. शंकरराव घुले नगराध्यक्ष, तर दिलीप गांधी उपनगराध्यक्ष होते. नगरपालिकेतर्फे वाजपेयी यांचा त्यावेळी सत्कार झाला. वाडिया पार्कवर एक लाख लोकांसमोर दिलीप गांधी यांचे पहिल्यांदाच भाषण झाले. त्यावेळी गांधी यांनी शंकरराव घुले यांचे नाव भाषणात वारंवार घेतले होते. सभा संपल्यानंतर वाजपेयी यांनी गांधी यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. वाजपेयी म्हणाले, ‘क्या गांधीजी, ‘आपका शंकर घुले के प्रती बहोत लगाव दिखता है. अपने सभा के अंदर घुले का आपने चार बार नाम लिया’, असे म्हणताच गांधी यांना त्यावेळी घाम फुटला. ‘मेरा पहिला भाषण था, गलती हो गयी’, असे सांगत गांधी यांनी त्यावेळी आपली चूक नम्रपणे सांगितली.सायकल... एस.टी. बसने प्रवासवाजपेयी यांनी १९८० पूर्वी अनेकवेळा जनसंघाचा प्रचार करण्यासाठी जिल्ह्याचा दौरा केला. सूर्यभान वहाडणे, राजाभाऊ झरकर, माणिकराव पाटील आदी स्थानिक नेते त्यांच्यासोबत होते. कधी सायकलवर, कधी मोटारसायकलवर तर कधी एस.टी. बसनेही वाजपेयी गावोगावी फिरले आणि नगर जिल्ह्यात जनसंघाचे काम उभे केले. भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर म्हणजे दिलीप गांधी नगर शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले. १९८६ साली वाजपेयी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष गौरव निधी संकलन केला. वाजपेयी यांच्यासाठी पैसे जमा होणार असल्याने लोकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली. ११ लाख रुपये गोळा झाले. ही थैली वाजपेयी यांना देण्यात आली.जीवन में चढ-उतार रहते हैखा. दिलीप गांधी वाजपेयी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात जहाजबांधणी मंत्री होते. मात्र त्यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीत गांधी यांचे तिकीट कापण्यात आले. तो दिवस होता १४ फेब्रुवारी २००४ चा. दुसऱ्या दिवशी गांधी हे वाजपेयी यांना भेटले. २०-२५ मिनिटे त्यांनी गांधी यांच्याशी चर्चा केली. ‘जीवन में चढ-उतार आते ही रहते है. नाराज नही होना. आगे काम करते रहना’. हाच वाजपेयी यांनी दिलेला मंत्र जपला. त्यावेळी अनेक पक्षांनी तिकीट देऊ केले होते. मात्र ते नाकारले आणि पक्षासाठीच काम करण्याचा निर्धार केला. वाजपेयी यांच्या प्रेरणेमुळेच पुन्हा भाजप पक्षाचाच खासदार होता आले, अशी भावना खा. गांधी यांनी व्यक्त करीत वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘लोकांवर टीका करण्यापेक्षा आपले काम लोकांना दाखवा’ हा वाजपेयी यांचा मंत्र घेऊनच वाटचाल करीत असल्याचे ते म्हणाले.अटलबिहारी वाजपेयी देशातील कर्तृत्ववान, प्रखर राष्टÑवाद असलेले समाजभक्त नेते होते. १९७८ पासून त्यांचा व माझा संपर्क होता. महाराष्टÑ जनता पक्षाचा मी अध्यक्ष असताना ते दौºयावर आले की त्यांच्या सभांचा मीच बºयाचदा अध्यक्ष असे. मी केंद्रात मंत्री असतानाही त्यांचा अनेकदा संपर्क आला. ते अत्यंत मायाळू स्वभावाचे होते. देशात जनता पक्षात फूट पडल्यानंतर ते भाजपचे अध्यक्ष झाले. पंडित नेहरुंनंतर वाजपेयी हाच एक प्रेमळ नेता होता. - बबनराव ढाकणे, माजी केंद्रीय मंत्री

राजकारणात येताना ज्यांचा आदर्श घेऊन काम करता येईल, अशा नेत्यांपैकी अटलजी एक होते. हा माणूस विद्वान, निस्सिम राष्टÑभक्त व नि:स्वार्थ होता. त्यांच्या वागणुकीत एक आपुलकी दिसत असे. त्यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तरुण पिढीसाठीही ते आदर्शवत होते. - पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव समिती 

अटलजींनी राजकारणाचा आदर्श घालून दिलामाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हाणी झाली आहे. सात्विक माणसे देशातून कमी होत आहेत. वैयक्तिक जीवनात त्यांचा काहीच स्वार्थ नव्हता. त्यांनी निष्काम कर्मभावनेने देशाची सेवा केली. एक आदर्श संसदपटू कसा असावा याचे ते ज्वलंत उदाहरण होते. पंतप्रधान होण्यापूर्वी व पंतप्रधान झाल्यावर त्यांची व माझी अनेकदा भेट होत असे. ते पंतप्रधान असताना त्यांनी मला एका कार्यक्रमासाठी बोलावले होते. पुण्यातही विविध कार्यक्रमानिमित्त आल्यावर ते माझी आठवण काढत असत. माझ्यासारख्या फकीर माणसाची ते नेहमी विचारपूस करीत असत. राजकारण व समाजकारण या दोन्ही बाजू त्यांच्या जीवनकार्यात दिसून येतात. -अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी