शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

अजूनही मला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही, पाणी पाटामध्ये येते, याचाच आनंद - बाळासाहेब थोरात

By शेखर पानसरे | Updated: May 31, 2023 07:36 IST

पावसाळा तोंडावर आला असताना भंडारदरा आणि निळवंडे धरणात दहा टीएमसी पाणी शिल्लक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : मी आमदार आहे. माझ्या कार्यक्षेत्रात आणि मतदारसंघात निळवंडे धरणाचे पाणी दिले जाते आहे. परंतु अजूनही मला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे संकेताला सोडून आहे. ही देखील वस्तुस्थिती आहे. जे काम आम्ही वर्षानुवर्ष करत होतो. जी मेहनत आम्ही करत होतो. त्याकरिता सातत्याने प्रयत्न करत होतो. ते पाणी पाटामध्ये येत आहे. याचाच आनंद आम्हाला आहे. असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी ( दि.३१) निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होत आहे. त्या संदर्भाने मंगळवारी ( दि.३०) आमदार थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, निळवंडे धरण कसे झाले, त्याकरिता कुणी प्रयत्न केले. हे सर्वांना माहीत आहे. हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

पावसाळा तोंडावर आला असताना भंडारदरा आणि निळवंडे धरणात दहा टीएमसी पाणी शिल्लक आहे. अशावेळी ते पाणी सोडले जात नव्हते. पुढील वर्षी दुष्काळाचा धोका सांगितला जात असून हे पाणी दुष्काळी भागाला मिळण्याकरिता मी आग्रह धरला. त्यांनी मान्य केले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. चाचणी करिता का होईना, पाणी सोडले जाते आहे. त्याचा आनंद मला आहे. आमच्या अनेक पिढ्यांनी निळवंडे धरण व्हावे, म्हणून आग्रह धरला होता. आंदोलने केली होती. परिषदा, उपोषाने केली. शेवटी त्याचे फळ मिळते आहे आणि उद्या पाणी सोडले जाते आहे. हा चांगला योग आहे. आता त्यांच्या हस्ते पाणी सोडले जाते आहे. याचे वाईट वाटण्याचे काहीही कारण नाही. शेवटी पाणी सोडले जाते आहे, याचाच आनंद मी मानतोय. भाषणामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. होऊ द्या तो प्रयत्न, त्याने काही फरक पडतो. असे मला काही वाटत नाही, असे थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस