शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पतीने 'व्हॅलेंटाइन'ला मृत्यूच्या दाढेतून परत आणले; यकृत प्रत्यारोपणाची किचकट शस्त्रक्रिया केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:46 IST

शस्त्रक्रियेसाठी लागणारी मोठी रक्कम उभा करण्याचे आव्हान समोर ठाकले होते.

आढळगाव : सध्या प्रेमीयुगुलांचे नाते बहरणारे वेगवेगळे 'डे' सुरू आहेत. मात्र, प्रेमाच्या दिखाव्यापेक्षा आपल्या 'व्हॅलेंटाइन'ला मृत्यूच्या दाढेतून परत आणणारा जीवनसाथी मिळण्याचे भाग्य श्रीगोंद्यातील महिलेला लाभले. त्याचबरोबर तिच्या मातेनेही लेकीसाठी स्वतःचा मोलाचा तुकडा देऊन जीवदान मिळण्यास मदत केली.

मीना दिलीप गाडे (रा. मांडवगण रोड, श्रीगोंदा), असे त्या भाग्यवान महिलेचे नाव आहे. त्यांची यकृत प्रत्यारोपणाची किचकट आणि खर्चिक शस्त्रक्रिया करून पती दिलीप गाडे यांनी मोठ्या कष्टाने मृत्यूच्या दारातून परत आणले. तर, त्यांच्या आई संगीता कापरे यांनी स्वतःच्या यकृताचा तुकडा देऊन आपल्या काळजाचा तुकडा वाचवला.

मीना यांचा विवाह श्रीगोंद्यातील शेतकरी कुटुंबातील दिलीप गाडे यांच्याशी २०१३ मध्ये झाला. शेतीबरोबरच प्लम्बिंगचीही कामे दिलीप करतात. संसारवेलीवर वेदिका आणि कोमल या दोन कळ्या उमलल्या. संसार सुरळीत सुरू असताना, एप्रिल २०२४ मध्ये मीना यांना सुरुवातीला काविळीचे निदान झाले. तीन चार महिने ठिकठिकाणी उपचार घेतले. त्यादरम्यान गरजेनुसार विविध तपासण्या केल्या, तरीही फरक पडला नाही. मीना यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला नगरला उपचार घेतले. त्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत व्हेंटिलेटरवर पुणे येथे एका खासगी रुग्णालयात हलविले. पत्नीचा जीव वाचविण्यासाठी यकृत प्रत्यारोपण करावे लागेल. असे सांगितल्यानंतर दिलीप यांच्या पायाखालची वाळू सरकली. पत्नीच्या काळजीने झोप उडाली, परंतु मीना यांची आई संगीता यांच्या यकृताचा तुकडा वापरून शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकते हा दिलासा मिळाला. परंतु, शस्त्रक्रियेसाठी लागणारी मोठी रक्कम उभा करण्याचे आव्हान समोर ठाकले.

पत्नीच्या काळजीबरोबरच मदत करणाऱ्यांच्या परतफेडीचे मोठे आव्हान उभे होते. मीना यांच्या नियमित तपासण्या सुरू असल्या, तरी त्या ठणठणीत असल्याचे समाधान दिलीप यांच्या चेहऱ्यावर दिसते. संकटात पाठीशी नव्हे, तर पुढे उभा राहणारा जीवनसाथी लाभला हेच प्रेम.

अनेकांचे मदतीचे हात..दिलीप यांनी मदतीसाठी आवाहन केले. जीवलग मित्र परिवार, प्लम्बिंगच्या कामातून संबंध आलेल्यांसह नातेवाइकांनी मोठी मदत केली. ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, विजय निंभोरे यांनी श्रीगोंदा शहरात फेरी काढून मदत गोळा केली. मुख्यमंत्री सहायता निधीही मिळाला. मोठ्या कष्टाने आवश्यक रक्कम उभी करून ऑगस्ट महिन्यात शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर डोळे भरून आले.

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे