अहमदनगर : जातीय अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यात वाढत्या जातीय अत्याचाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व पंडित वाघमारे, किशोर उमाप आणि राम बागळे यांनी केले. आंदोलनकर्त्यांनी खर्डाप्रकरणात शाळेचे प्राचार्य, वर्गशिक्षक यांना सहआरोपी करत, त्यांची नार्को टेस्ट करावी, नितीन आगेच्या शवविच्छेदन अहवालात फेरफार करणार्या डॉक्टरावंर कारवाई करावी, पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या दलितांवरील अत्याचारांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात सुनील शिंदे, दिलीप सकट, अनंत लोखंडे, एन.एम. पवळे, अनिल ओहोळ, सुभाष आल्हाट, गिरीष नेटके, भगनवान जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले. (प्रतिनिधी)
अत्याचार विरोधी संघर्ष समितीचे उपोषण
By admin | Updated: February 3, 2024 10:50 IST