शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

किती दिवस मुलांना मोफत शिकवायचं? संस्थाचालकांचा सवाल

By चंद्रकांत शेळके | Updated: August 3, 2023 15:15 IST

आरटीई प्रवेश : इंग्रजी शाळांचे पाच वर्षांपासून शासनाकडे थकले ७५ कोटी

चंद्रकांत शेळके अहमदनगर : आरटीई कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये पहिलीत २५ टक्के मोफत प्रवेश मिळतात. त्या बदल्यात शासन या शाळांना प्रतिपूर्ती रक्कम देते, परंतु नगर जिह्यातील शाळांना गेल्या पाच वर्षांपासून सुमारे ७५ कोटी रुपयांची रक्कम शासनाने दिलेली नाही. ही रक्कम थकल्याने किती दिवस मुलांना मोफत शिकवायचे, असा प्रश्न शाळांकडून विचारला जात आहे.

यात प्रत्येक विद्यार्थ्यामागे ठरावीक प्रतिपूर्ती रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून या शाळांना मिळते. यात केंद्राबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेश खासगी इंग्रजी शाळांमध्ये दिले जातात.चा वाटा ६० टक्के, तर राज्याचा वाटा ४० टक्के आहे, परंतु गेल्या पाच वर्षांपासून शासनाने ही प्रतिपूर्ती थकविली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत शासनाने ३३ कोटी ८३ लाखांचे अनुदान शाळांना दिले आहे, तर ७५ कोटी २५ लाखांचे अनुदान अजून सरकारकडून येणे बाकी आहे. यात गेल्या तीन वर्षांत तर एकही रुपया अनुदान आलेले नाही. त्यामुळे या शाळा कशा चालवायच्या, असा प्रश्न शाळांना पडला आहे.

प्रतिपूर्ती रक्कम थकल्याने शाळांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. २५ टक्के अनुदान शासनाकडून थकीत आहे, तर २५ टक्के शुल्क पालकांकडून थकविले जाते. असे ५० टक्के रक्कम मिळणार नसेल, तर या शाळा कशा चालणार?- देवीदास गोडसे, जिल्हाध्यक्ष, मेस्टा.

जिल्ह्यासाठी आरटीईची वर्षनिहाय थकलेली रक्कम२०१८-१९    : ४ कोटी ६ लाख२०१९-२०    : १७ कोटी ९७ लाख२०२०-२१  : १० कोटी ६२ लाख२०२१-२२   : १२ कोटी २५ लाख२०२२-२३    : ३० कोटी ३३ लाखएकूण ७५ कोटी २५ लाख

राज्यात थकले ३,१०० कोटीराज्यात एकूण ९ हजार ४३१ शाळा असून, दरवर्षी ९६ हजार विद्यार्थी मोफत प्रवेश घेतात, परंतु आतापर्यंत यात ४८७ कोटी केंद्राकडून, तर ३,१०० कोटी राज्याकडून येणे बाकी आहेत. त्यामुळे ही रक्कम कधी मिळणार, याची प्रतीक्षा शाळा चालकांना आहे.

टॅग्स :SchoolशाळाRight To Educationशिक्षण हक्क कायदा