शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रेमात हा माणूस किती भरकटणार आहे? किती आंधळे प्रेम हे”

By सुदाम देशमुख | Updated: April 2, 2023 14:41 IST

- संजीव भोर यांची संजय राऊत यांच्यावर टीका 

अहमदनगर: सावरकर दाढी वाढवणाऱ्यांच्या विरोधात होते मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाढी काढणार का? असा प्रश्न उपस्थित करणारे संजय राऊत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रेमात किती भरकटणार असा सवाल  शिवसेनेचे(शिंदे गट) प्रवक्ते संजीव भोर यांनी केला आहे. 

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनाही अनेक वर्ष दाढी होती. मग राऊतांना बाळासाहेबही सावरकरांच्या विचाराच्या विरोधात होते असे म्हणायचे आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी होती म्हणजे सावरकर छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्यांमधले होते असेच तर राऊत यांना सांगायचे नाही ना?     शिंदेंनी सावरकरांचे साहित्य वाचले आहे का? असा प्रश्न करणाऱ्या राऊतांना स्वतःस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे माहित नसावं? दररोज घटना बचावचा रट लावताना बाबासाहेब आंबेडकरांचे व बाबासाहेबांविषयीचे साहित्य संजय राऊत यांनी तरी वाचले आहे का? हा प्रश्न येथे उपस्थित होतो. हे महाशय कधीतरी स्वतःचे अंतरंग तपासून बघतील की नाही? उचलायची जीभ आणि लावायची टाळ्याला हा संजय राऊत यांचा धंदा झाला आहे.      संजय राऊत म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी टाइमपास व करमणुकीचं साधन बनले आहेत. महाराष्ट्रातल्या गावागावात जत्रां निमित्त तमाशा असतो. जत्रेच्या दिवशी रात्री तमाशाचा कार्यक्रम सादर केल्यानंतर या तमाशातले कलाकार दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांसमोर आपली कला सादर करून हजेरी देत असतात. तशी संजय राऊत यांची दररोज सकाळी महाराष्ट्रातील जनतेसाठी माध्यमांसमोर हजेरी असते. या माणसाला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ सापडत नाही अशी त्यांची अवस्था आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAhmednagarअहमदनगर