श्रीगोंदा : येथे आदर्श बहुजन शिक्षक संघाच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले व क्रांती ज्योती फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षकांचा व ‘लोकमत’चे श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी बाळासाहेब काकडे यांचा दिनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
हा सन्मान आमदार बबनराव पाचपुते, सभापती वैजयंता पांडुळे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, बाळासाहेब महाडीक, सीमा गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पाचपुते म्हणाले, शिक्षक हा समाज परिवर्तनाचा कणा आहे. शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रातील बदल स्वीकारले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, राजेंद्र पोटे, तनुजा शिंदे, गौतम मिसाळ, अशोक नेवसे, एकनाथ व्यवहारे, रवींद्र होले, रमेश सोनवणे यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक इब्टाचे राजाध्यक्ष उत्तरेश्वर मोहळकर यांनी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, प्रा. बबन कसबे, प्रशांत गोरे, ज्ञानेश्वर कलगुंडे, विठ्ठल सोनवणे, दिलीप काटे, अविनाश निंभोरे, अरिफ शेख, सतीश लगड, शुभांगी लगड आदी उपस्थित होते.
---
पुरस्कारप्राप्त शिक्षक..
राजेंद्र पोटे, शोभा कोकाटे, सतीश भोंग, सुरेश खोडके, सीमा साळवे, नंदकुमार शितोळे, मनीषा व्यवहारे, तुषार दळवी, रोहिणी डोमे, शहाराम ऐरकळ, संतोष करपे, सुनीता ढवळे, सोनाली रणदिवे, रेखा रायकर, पोपट पवार, उज्ज्वला गायकवाड, अशोक टकले, विद्या मंदीलकर, सविता ठुबे, नामदेव रायकर, बाबासाहेब ठाणेकर, रवींद्र पाडळे, ज्ञानदेव तरटे, संगीता भदे, संगीता कुटे, महेंद्र सुरशे, तनुजा शिंदे, शशिकांत मांडगे, भागश्री शिंदे, शमशाद शेख, संदीप खाडे, शंकर मोरे, सुनीता बोरुडे.
----
०५ श्रीगोंदा
श्रीगोंदा येथे शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.