नगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेतील दहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील चार, तर पूर्व उच्च माध्यमिक परीक्षेतील सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी एनएमएमएस परीक्षेतील शिष्यवृत्ती पात्र तीन विद्यार्थी, एसओएफ परीक्षेतील गोल्ड मेडलधारक तीन विद्यार्थी आणि भारती विद्यापीठ सामान्यज्ञान परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी यांचाही गौरव करण्यात आला. त्यामध्ये आर्या जायभाय, आदेश ताठे, श्रावणी धनेश्वर, मुग्धा कुलकर्णी, आठवीतील श्रीया पटवा, प्रणव सानप, शेखर कुलकर्णी, गीता घुले, यश चेमटे, शेखर येमुल, तन्मयी सग्गम, अभिषेक लातुरकर, सायली आर्दड व मनस्वी संभार, सृष्टी वायकर आदींचा सत्कार करण्यात आला. शालेय समिती चेअरमन अॅड. किशोर देशपांडे, सेक्रेटरी प्र. स. ओहळ, संस्थेचे उपाध्यक्ष भा. ल. जोशी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता जोशी, पर्यवेक्षिका संगीता सोनटक्के, सुनील कानडे, अरुण राशीनकर, अनुराधा शास्त्री, व्ही. गायकवाड, मनीषा अंबाडे, स्वप्ना कुलकर्णी, प्रियंका कासार, चैताली गोरे, कविता महाजन आदींचे मार्गदर्शन लाभले.
-------
फोटो-०६ गुणवंत सत्कार
श्री समर्थ प्रशालेतील विविध परीक्षांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.