शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
4
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
5
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
6
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
7
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
8
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
9
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
10
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
11
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
12
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
13
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
14
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
15
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
16
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
17
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
18
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
19
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
20
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!

खर्डा लढाईचा नागलवाडीतील ऐतिहासिक तळ दुर्लक्षित; सीना नदीपात्रात सापडतात लढाईच्या खुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 14:37 IST

निजाम आणि पेशवे सैन्य यांच्यातील खर्डा लढाईचा नागलवाडीतील (ता. कर्जत) ऐतिहासिक तळ दुर्लक्षित आहे. पुरातत्त्व विभागासह इतिहास तज्ज्ञांकडूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे.

विनायक चव्हाण । मिरजगाव : निजाम आणि पेशवे सैन्य यांच्यातील खर्डा लढाईचा नागलवाडीतील (ता. कर्जत) ऐतिहासिक तळ दुर्लक्षित आहे. पुरातत्त्व विभागासह इतिहास तज्ज्ञांकडूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे.खर्डा लढाई ही निजाम व पेशवे यांच्यात दोन वेळा झाली होती. परंतु, पहिली लढाई हरल्यानंतर पेशव्यांनी पुन्हा निजामावर चाल केली. यावेळी पेशव्यांच्या सैन्याचे सरसेनापती नानासाहेब फडणवीस होते. त्यांनी या खर्डा लढाईसाठी शिंदे, होळकर पवार या सेनापतींना या लढाईसाठी पाचारण केले. यावेळी कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथे पेशव्यांचे सरदार बांदल म्हणून होते. याच ठिकाणी पेशव्यांनी सैन्याचा तळ ठोकला होता. नागलवाडी ते खर्डा हे ४५ किलोमीटरचे अंतर आहे. नागलवाडी ते खर्डा किल्ल्यापर्यंत भुयार खोदण्यात आले होते. या भुयारातून शस्त्रसाठा पुरविला जात असे. याच लढाईत या खर्डा किल्ल्यावर रक्ताचे पाट वाहिल्याची इतिहासात नोंद आहे. नागलवाडी येथूनच या लढाईसाठी शस्त्र पुरवठा केला गेला. नागलवाडी हे गाव श्रीमंताची वाडी म्हणून ओळखले जात असे. ज्या वाड्यात सैन्याचा तळ होता तो वाडा आज भंग्नावस्थेत आहे. पेशव्यांचे सरदार असलेल्या बांदल यांच्या वंशजाकडे हा वाडा आहे. या वाड्यात तीन भव्य भुयार असून, त्यांची पडझड झाली आहे. मोगलांच्या काळात जेव्हा तोफांचे बार या नागलवाडीच्या दिशेने उडवले जात असे. तेव्हा याच वाड्यात दोनशे बैलगाड्या, जनावरे व वाडीतील सर्व महिला या वाड्यातील भुयारात लपविण्यात आले होते. लढाईतील शस्त्रसाठा, धन, सैन्याची रसद याच वाड्यात ठेवली असल्याची माहिती काही वयोवृद्ध गावकरी सांगतात. नागलवाडी येथे सीना नदीपात्र विस्तीर्ण आहे. लढाईवेळी पायदळातील घोडे, हत्ती, उंट येथे ठेवले होते. येथे त्याच्याही काही खुणा आढळतात. वाळू उपसा करतेवेळी हत्तीला बांधून ठेवायचे साखळदंड सापडले आहेत. इतिहासात गाजलेल्या खर्ड्याच्या लढाईचा  साक्षीदार हा वाडा आहे. याकडे सध्या पुरातत्त्व विभागासह इतिहास दुर्लक्ष झाले आहे. अधिक संशोधन गरजेचेखर्डा लढाईतला शस्त्रसाठा, धन, तसेच ऐतिहासिक दस्ताऐवज या ठिकाणी या वाड्याचे उत्खनन केले. तर मिळू शकतील, असे या गावक-यांचे म्हणणे आहे. या ठिकाणाचे संशोधन होऊन या ऐतिहासिक स्थळाचा विकास होणे गरजेचे आहे. मात्र याकडे पुरातत्त्व विभागासह इतिहासप्रेमींचेही दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFortगडJamkhedजामखेडhistoryइतिहास