ग्रामीण भागातील खेळाडूंमध्येही उच्च गुणवत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:17 IST2020-12-26T04:17:15+5:302020-12-26T04:17:15+5:30
नगर तालुक्यातील आढाववाडी येथे एएमपीएल क्रिकेट लीग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या टेनिस क्रिकेट लीग स्पर्धेत ...

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्येही उच्च गुणवत्ता
नगर तालुक्यातील आढाववाडी येथे एएमपीएल क्रिकेट लीग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या टेनिस क्रिकेट लीग स्पर्धेत जिल्ह्यातील चाळीस संघांनी सहभाग नोंदविला आहे. प्रथम पारितोषिक ३१००० रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक २१०००, तृतीय पारितोषिक ११००० व चतुर्थ पारितोषिक ७००० रूपये ठेवण्यात आले आहे. या उद्घाटन कार्यक्रमास अक्षय कर्डिले, मांजरसुंब्याचे सरपंच जालिंदर कदम, डोंगरगणचे सरपंच कैलास पठारे, सावता माळी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. देवराम शिंदे, रामेश्वर निमसे, महेश भराडिया, संतोष ढोकणे, आबासाहेब कदम, बापू आढाव, दत्तात्रय कदम, नितीन कदम व विविध संघांतील खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब घोरपडे, अमोल आढाव, सुनील गवारे, शरद झेंडे, अंबादास कदम, शरद घोरपडे आदी परिश्रम घेत आहेत.
--------
फोटो ओळी-२५पिंपळगाव क्रिकेट
आढाववाडी येथील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे नाणेफेक करून उद्घाटन करताना माजी आमदार शिवाजीराव कर्डिले.