शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७० आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कृषी विभागाकडून मदतीचा हात; प्रत्येकी ५० हजारांचा लाभ

By चंद्रकांत शेळके | Updated: January 3, 2024 20:12 IST

अनुदानातून खरेदी करावे लागणार कृषी साहित्य

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे चालू आर्थिक वर्षात ७० आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. प्रत्येकी ५० हजारांचे अनुदान या कुटुुंबांना देण्यात येत असून, त्यातून कृषी साहित्य संबंधित शेतकऱ्यांंना खरेदी करता येणार आहे. यात काहींना लाभ दिलेला आहे.

सन २०१७-१८ पासून जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सेस फंडामधून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी प्रतिकुटुंब ५० हजारांची मदत देण्यात येत आहे. सन २०२२-२३ पर्यंत जिल्ह्यातील १३७ कुटुंबांना अशा प्रकारे मदत देण्यात आलेली आहे. यामुळे शेतीसाठी उपयुक्त बियाणे, खते, औषधे, औजारे, विद्युत पंप, पी.व्ही.सी. पाइप, दूध काढणी यंत्र, ट्रॅक्टरचलित औजारे खरेदीसाठी अशा कुटुंबांना हातभार लागला आहे.

सन २०२३-२४ या वर्षामध्ये १० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेती उपयोगी साहित्य खरेदीसाठी पाच लाखांची तरतूद जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे यातून १० कुटुंबांना मदत देण्यात आली; परंतु जिल्ह्यात ६४ कुटुंब नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रतीक्षा यादीत होते. यातील अधिकाधिक कुटुंब योजनेत समाविष्ट करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने हवामान केंद्र स्थापन करण्याचा १५ लाखांचा निधी शेतकऱ्यांसाठी वळवला. त्यामुळे यातून ३० कुटुंब मदतीच्या कक्षेत आले. उर्वरित ३४ कुुटुंबांनाही मदत देण्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्याचे नियोजित आहे. अशा प्रकारे सर्व आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा समावेश योजनेत झालेला आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी दिली.३३३ शेतकऱ्यांना कडबाकुट्टी

शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी देण्याच्या योजनेतही चालू आर्थिक वर्षी ३३३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. यासाठी सेस फंडातून प्रथमच ३० लाखांची तरतूद केलेली होती. प्रतिलाभार्थी ९ हजार रुपये यात देण्यात येतात. ३३३ अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या मार्गदर्शक तत्त्वानुसार मंजुरी देऊन लाभ देण्यात आला.

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर