शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बेलपिंपळगाव हद्दीत हॉटेल चालकाचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 13:38 IST

बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली घटना : तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार

पाचेगाव (जिल्हा अहमदनगर): पहाटे झोपेत असताना एका हॉटेल चालकाचा डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत निर्घृण खून करण्यात आल्याची घटना श्रीरामपूर नेवासा मार्गावरील लोखंडी फॉलजवळ बेलपिंपळगाव(ता.नेवासा) शिवारात बुधवारी(दि.१३) पहाटे घडली. सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली.    बाळासाहेब सखाहरी तुवर(वय अंदाजे ६०) रा. कारवाडी(पाचेगाव) ता. नेवासा असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. श्रीरामपूर नेवासा मार्गावरील लोखंडी फॉल नजीक ओम साई नावाने ते हॉटेल चालवीत होते. बुधवारी(दि.१३ मार्च) पहाटेच्या सुमारास झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.        नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून घटनेचा तपास सुरु असून दुपारी न्यायवैद्यक पथकही दाखल झाले होते.     उपनिरीक्षक विजय भोंबे, बिट हवालदार बबन तमनर, सुमित करंजकर, पोलीस नाईक आप्पासाहेब वैद्य, राहुल गायकवाड घटनेचा तपास करत असून हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी