शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar: हृदयद्रावक! कारमध्ये बसत असताना ट्रकने उडवले, पत्नीसमोरच पतीचा मृत्यू

By अण्णा नवथर | Updated: October 23, 2023 23:50 IST

Ahmednagar: रस्त्यात काहीवेळासाठी थांबून कारमध्ये बसत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.

- अण्णा नवथर अहमदनगर - रस्त्यात काहीवेळासाठी थांबून कारमध्ये बसत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नगर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील इमामपूर घाटात सोमवारी (दि. २३) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला. प्रदीप सखाराम खेलुरकर ( वय ६६, रा. छत्रपती संभाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

अपघात झाला, त्यावेळी त्यांच्या पत्नी, मुलगी आणि जावईही सोबत होते. एकाच कारमधून हे कुटुंब पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. काही वेळासाठी ते इमामपूर घाटात थांबले. त्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले. कारचा दरवाजा उघडून बसत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने प्रदीप यांना जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोराची होती, की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातावाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

प्रदीप खेलूरकर हे एका कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. सध्या ते वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाचे सचिव म्हणून काम पाहत होते. त्यांच्या पत्नी निर्मला खेलूरकर एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. दरम्यान, कारला धडक देणारा ट्रक पाठलाग करत नेवासा फाटा येथे पकडला असून, याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर