शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
3
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
4
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
5
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
6
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
7
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
8
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
9
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
10
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
11
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
12
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
13
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
14
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
15
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
16
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
17
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
18
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
19
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
20
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...

खात्यातील पैसे सांभाळा ; ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:24 IST

अरुण वाघमोडे लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : खून, दरोडा, मारहाण, जबरी चोरी, अत्याचार आदी गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांचा हातखंडा ...

अरुण वाघमोडे

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : खून, दरोडा, मारहाण, जबरी चोरी, अत्याचार आदी गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांचा हातखंडा आहे. मात्र, डिजिटल युगात हायटेक पद्धतीने घडणारे सायबर क्राइम पोलिसांसाठी आव्हान ठरत आहेत. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत सायबर क्राइमसंदर्भात तब्बल ११०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत हे प्रमाण तब्बल आठ पटींनी वाढल्याचे आकडेवारीतून दिसते.

अनोळखी व्यक्तीला ओटीपी क्रमांक सांगणे, तक्रारीसाठी कस्टमर केअरला फोन करणे, इंटरनेटवरील साइटवर जॉब सर्च करणे, ऑनलाइन वाहन खरेदी या माध्यमांतून ग्राहकांची सर्वाधिक आर्थिक फसवणूक झाली आहे. ई-मेल, व्हाॅटस्ॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, ऑनलाइन बँकिंग आणि इतर व्यवहारांसाठी इंटरनेटचा वापर करणाऱ्या उपभोक्त्यांना सायबर गुन्हेगार लक्ष्य करीत आहेत. स्वस्तात वाहन गिफ्ट, तत्काळ कर्ज, लॉटरी, पैशांच्या बक्षिसाचे आमिष दाखवून, तर कधी प्रेमाच्या मोहात पाडून सायबर गुन्हेगारांनी गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे ऑनलाइन पद्धतीने करोडे रुपये लुटले आहेत. सायबर गुन्हेगार देशात कुठेतरी बसून अशा स्वरूपाचे गुन्हे करतात. त्यामुळे भौगोलिक मर्यादा आणि तांत्रिक अडचणींमुळे तपासाला मर्यादा पडतात. त्यामुळे इतर गुन्ह्यांच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

पाच वर्षांत दाखल तक्रारी

२०१७- २५०

२०१८- ५५३

२०१९- ८८५

२०२०- १,९२८

२०२१(ऑगस्टपर्यंत)- ११००

.......................

१,३०० तक्रारींचा तपास पूर्ण

१२ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत येथील सायबर पोलीस ठाण्यात १,९२८ तक्रारी दाखल झाल्या होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी १,३०० तक्रारींचा तपास पूर्ण केला. सायबर पोलीस ठाण्यात २०१७ ते २०२० या कालावधीत एकूण २४ गुन्हे दाखल झाले. यातील ११ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

...............

महिलांनी घ्यावी दक्षता

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या महिलांना सायबर गुन्हेगारांकडून लक्ष्य केले जाते. अकाउंट हॅकिंग, अश्लील चॅट, फोटोंचे मॉर्फिंग तर कधी मेसेज व व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

................

अशी घ्यावी काळजी

ऑनलाइन व्यवहार आणि डिजिटल तंत्रज्ञान वापरताना नागरिकांनी दक्षता घेतली, तर या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल. ऑनलाइनवर येणाऱ्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, आपली वैयक्तिक अथवा बँक खात्याशी संबंधित माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये. अधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातूनच ऑनलाईन व्यवहार करावेत.

-नंदकुमार दुधाळ, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, अहमदनगर