शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘माउली’च्या मदतीला साईनगरीतून माणुसकीचा हात, लॉकडाऊनमुळे मदत थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:21 IST

शिर्डी : लॉकडाऊनमुळे मदत थांबल्याने अडचणीत आलेल्या शिंगवे (ता. नगर) येथील माउली प्रतिष्ठानला मदतीचा ओघ सुरू झाला आहे़ सार्इंच्या नगरीतील अनेकांनी यात योगदान देऊन साईबाबांच्या शिकवणुकीचा व माणुसकी जीवंत असल्याचा परिचय दिला आहे़ नगर जवळील शिंगवे येथे डॉ़ राजेंद्र धामणे व डॉ़ सुचेता धामणे यांनी रस्त्यावर जगणाऱ्या बेवारस, मनोरूग्ण, व अत्याचार पीडित माता-भगिनींना आयुष्यभरासाठी माउली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून निवारा उपलब्ध करून दिला आहे़ या प्रकल्पात सध्या ३०२ माता-भगिनी व त्यांची येथेच जन्मलेली २८ बालके कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत़ 

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : लॉकडाऊनमुळे मदत थांबल्याने अडचणीत आलेल्या शिंगवे (ता. नगर) येथील माउली प्रतिष्ठानला मदतीचा ओघ सुरू झाला आहे़ सार्इंच्या नगरीतील अनेकांनी यात योगदान देऊन साईबाबांच्या शिकवणुकीचा व माणुसकी जीवंत असल्याचा परिचय दिला आहे़नगर जवळील शिंगवे येथे डॉ़ राजेंद्र धामणे व डॉ़ सुचेता धामणे यांनी रस्त्यावर जगणाऱ्या बेवारस, मनोरूग्ण, व अत्याचार पीडित माता-भगिनींना आयुष्यभरासाठी माउली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून निवारा उपलब्ध करून दिला आहे़ या प्रकल्पात सध्या ३०२ माता-भगिनी व त्यांची येथेच जन्मलेली २८ बालके कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत़ सरकारी अनुदानाशिवाय केवळ दानशूरांच्या मदतीवर हा प्रकल्प सुरू आहे़ लॉकडाऊनमुळे देणगीदारांचा ओघ थांबल्याने धामणे दाम्पत्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहीला आहे़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘माउलीला हवा मदतीचा हात’ या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली़ शिर्डीकरांनी याला तत्काळ प्रतिसाद देत मदत गोळा केली़कैलास कोते, अर्चना उत्तमराव कोते, वत्सलाबाई गोविंद कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, बाबासाहेब कोते, बाळासाहेब लुटे, पुखराज लोढा, रतीलाल लोढा, नितीन शेळके, अरविंद कोते, दत्तात्रय गोविंद कोते, कमलाकर कोते, राजेंद्र कोते, राहुल गोंदकर, केतन कोते, मधुकर कोते, विकास गोंदकर, निखील बोरावके, सचिन जगताप, जितेंद्र गाढवे यांच्याकडून प्रत्येकी एक पोते गहू, सुजीत गोंदकर यांच्याकडून पाच, शिलधी प्रतिष्ठाण कडून सहा, सुनिल निकम व रमेश राऊत यांच्याकडून दोन, साईश्वरी सुनील वारूळे या लहानगीने आपला डबा फोडून पाच गोणी तांदूळ दिला़ अकोळनेरचे सुनील गारूडकर, पुण्याचे लक्ष्मण काकडे यांनी माउलीला थेट मदत पाठवली़ दादासाहेब जांभुळकर, रविंद्र कोते, विजय आप्पासाहेब कोते, तुषार शेळके, निलेश सावे, कुणाल आभाळे, लता रायरीकर, मुंबईचे प्रतिक जाधव, डॉ़ यशोधन पितांबरे, डॉ़ मैथिली पितांबरे, डॉ़ उज्वला काळे, डॉ़ सुशील सावंत, व कराडच्या कृष्णा सख्या गु्रप आदींकडून मिळालेल्या देणगीतून जवळपास सत्तावीस हजारांचा किराणा घेण्यात आला़ चेतन कदम व राजन शेंडगे यांनी अडीचशे किलो कांदा पाठवला़-------माउली अनाथ महिलांसाठी मायेचा वटवृक्ष आहे़ साईबाबांच्या शिकवणुकीवर विश्वास असलेल्या प्रत्येकाने संकटसमयी या प्रकल्पाला मदत करायला हवी़ कैलास कोते, माजी नगराध्यक्ष-माउली मध्ये साईबाबांना अभिप्रेत असलेले कार्य सुरू आहे़ साईसंस्थान कडून कायमस्वरूपी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.- अर्चना कोते, नगराध्यक्षा------------शिर्डीत जेव्हा निराधार व बेवारस महिला आढळतात तेव्हा आम्ही हक्काने त्यांना डॉ़ धामणे यांच्या माउलीच्या छायेत पाठवतो़ ‘लोकमत’ने माउलीच्या व्यथा समाजासमोर मांडून दानशूरांना योग्य ठिकाणी मदतीची संधी उपलब्ध करून दिली़डॉ़ मैथिली पितांबरे