जामखेडमध्ये बुधवारी हाफ मॅरेथॉन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:19 IST2021-01-22T04:19:58+5:302021-01-22T04:19:58+5:30

जामखेड : युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी ...

Half marathon competition on Wednesday in Jamkhed | जामखेडमध्ये बुधवारी हाफ मॅरेथॉन स्पर्धा

जामखेडमध्ये बुधवारी हाफ मॅरेथॉन स्पर्धा

जामखेड : युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी (दि.२७) राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती उपमहाराष्ट्र केसरी व मल्लविद्या संस्कार फाऊंडेशनचे विश्वस्त बबनकाका काशीद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्धेचे उद्घाटन आ. रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामधे पुरुषांसाठी १५ कि.मी. धावणे अकरा हजार रुपये, द्वितीय सात हजार, तृतीय पाच हजार, चतुर्थ तीन हजार, पाचवे दोन हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. महिलांसाठी आठ कि.मी. धावणे स्पर्धा असून प्रथम बक्षीस पाच हजार, द्वतीय चार हजार, तृतीय तीन हजार, चतुर्थ दाेन हजार, पाचवे एक हजार अशी बक्षिसे आहेत.

Web Title: Half marathon competition on Wednesday in Jamkhed