शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांचे कट्टर समर्थक राऊत उतरणार विधानसभेच्या आखाड्यात, कर्जतमध्ये महामेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:53 IST

अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले कर्जत नगरपालिकेचे नगराध्यक्ष नादेव राऊत यांचा कर्जत येथील संकल्प महामेळावा सुरु झाला असून, मेळाव्यापूर्वी त्यांनी भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. ‘आपला माणूस, आपला आमदार’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

जामखेड : अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले कर्जत नगरपालिकेचे नगराध्यक्ष नादेव राऊत यांचा कर्जत येथील संकल्प महामेळावा सुरु झाला असून, मेळाव्यापूर्वी त्यांनी भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. ‘आपला माणूस, आपला आमदार’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे राऊत विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे हे संकेत मानले जात आहेत़ मात्र, अद्याप राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही.महासंग्राम युवा मंचच्यावतीने नामदेव राऊत यांनी हा मेळावा आयोजित केला आहे. नामदेव राऊत यांना आमदार बनवण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या युवकांनी हा मेळावा घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. त्यादृष्टीनेच मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांच्या शाखा कार्यरत करण्यात आल्या आहेत. राजकारणातील स्पर्धकांना धडकी भरविणारे आणि उच्चांकी गर्दीचे सामाजिक उपक्रम ‘महासंग्राम’ने वेळोवेळी घेतलेले आहेत. ‘देवा गृप’ नावानेही तालुक्यात राऊत यांचे मोठे संघटन आहे. सोमवारी राऊत यांची मेळाव्यापूर्वी अक्काबाई मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पहिल्या रथात राऊत यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले होते. दुसऱ्या रथामध्ये कर्जतच्या नगरसेविका होत्या. विविध वाद्यांच्या ठेक्यावर घोषणा देत युवक नाचत होते.दोन्ही तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणत्याही परिस्थितीत आपल्या नेत्याला आमदार बनवण्याचा चंग बांधलेल्या तरुणांकडून ‘आपला माणूस आपला आमदार’, ‘कर्जत आमची पंढरी- देवा आमचा विठ्ठल’ अशा घोषणाही रॅलीत देण्यात आल्या. सोशल मीडियावरही अशा टॅगलाईन युवा मंचकडून व्हायरल केल्या जात आहेत. नामदेव राऊत हे संकल्प मेळाव्यातील एकमेव मार्गदर्शक असून ते कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवारीचा निर्णय जाहीर करणार का, हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. राऊत यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्यास पालकमंत्री राम शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदेBJPभाजपाNamdev Rautनामदेव राऊतkarjat-jamkhed-acकर्जत-जामखेड