शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री राम शिंदे यांनी केले अतिक्रमण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 15:23 IST

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी असलेल्या प्रा. राम शिंदे यांचे रेकॉर्डवरील खरे नाव रामदास शंकर शिंदे आहे.

अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांनी अधिका-यांवर दबाव आणून व सत्तेचा दुरुपयोग करुन सदरचे अतिक्रमण केलेले आहे. या अतिक्रमणामुळे गावातील व इतर लोकांना रस्त्याचा वापर करताना अडचणी निर्माण झाल्या असल्याची तक्रार कैलास शेवाळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. 

 कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी असलेल्या प्रा. राम शिंदे यांचे रेकॉर्डवरील खरे नाव रामदास शंकर शिंदे आहे. ते विधानसभा निवडणुकीमध्ये दुस-यांदा निवडून आले आहेत. मागील तीन ते साडेतीन वर्षे त्यांनी जलसंधारण मंत्री म्हणून काम करत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करतांना कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केलेला आहे. पालकमंत्र्यांनी चौंडी (ता.जामखेड) येथील अविनाश साहेबराव शिंदे यांच्याकडून खरेदी केलेली आहे. या जागेचे क्षेत्रफळ काढल्यास ते 2528 चौरस मीटर होत आहे. त्यावर त्यांचे वडिल शंकर बापू शिंदे यांची मालकी आहे. तहसीलदार जामखेड यांनी बिनशेती परवानगी देण्याचा आदेश पारीत करताना परवानगी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तसेच रेखांकनात नकाशात दर्शविल्याप्रमाणे खुली जागा कायम खुली ठेवण्यात यावी. कोणतेही रहिवास प्रयोजनार्थ बांधाकम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील चौंडी ते अरणगाव या रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अंतर सोडून आणि चौंडी ते देवकरवस्ती या रस्त्याच्या मध्यापासून १२ मीटर अंतर सोडून बांधकाम करण्यात यावे अशी अटही त्यांनी घातलेली आहे. असे असताना या अटीचा बांधकाम करताना कोणताही विचार न करता शंकर बापू शिंदे यांनी चौंडी ते अरणगाव रस्त्याच्या मध्यापासून ५ मीटर पूर्वेकडील बाजूस अतिक्रण केले आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी अधिका-यांवर दबाव आणून व सत्तेचा दुरुपयोग करुन सदरचे अतिक्रमण केलेले आहे. या अतिक्रमणामुळे गावातील व इतर लोकांना रस्त्याचा वापर करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पालकमंत्री राम शिंदे हे त्या इमारतीमध्ये स्वत: राहात आहेत. दोन्ही सरकारी रस्त्यांवरील अतिक्रमण त्वरीत काढून टाकण्याबाबत तात्काळ चौकशी होऊन आदेश देण्यात यावेत. अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करण्यात येईल, असा इशारा कैलास शेवाळे यांनी निवेदनात दिला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदे