शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : बैलजोडीची खूण धर ध्यानी गं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 14:32 IST

मैलागणिक भाषा बदलते. तसेच प्रश्नही बदलतात. पण, पाणी ही एक सामायिक समस्या जिल्ह्यातील बहुतेक भागात फिरताना जाणवते

अहमदनगर : मैलागणिक भाषा बदलते. तसेच प्रश्नही बदलतात. पण, पाणी ही एक सामायिक समस्या जिल्ह्यातील बहुतेक भागात फिरताना जाणवते. नगर मतदारसंघातील वांबोरी, खोसपुरी, शिराळ हा प्रदेशही दुष्काळाच्या झळा सोसतो आहे.राहुरी तालुक्यातील वांबोरी हे बाजारपेठेचे मोठे गाव आहे. टरबूज विकणारा एक शेतकरी वांबोरीच्या चौकात भेटला. शेतीत पाणी राहिले नाही म्हणून चिंतेत होता. वांबोरी चारी झाली. मात्र, त्यातून वांबोरी बारमाही सिंचनाखाली आलेली नाही. पाथर्डी तालुक्यातील गावांची अशी तक्रार आहे की वांबोरीला या चारीचा सर्वाधिक फायदा होतो. मात्र, वांबोरीचे शेतकरीही या चारीबाबत पूर्णत: समाधानी दिसत नाहीत.गप्पांच्या ओघात मतदानाचा विषय निघाला. हा शेतकरी विज्ञान शाखेतील पदवीधर होता. आंतरराष्टÑीय पातळीवर काय घडामोडी सुरू आहे हे सुद्धा तो बोलत होता. शेतकऱ्याला या सरकारच्या काळात काही मिळाले नाही, अशी त्याची नाराजी होती. मात्र, मोदींच्या इतर काही धोरणांचे तो स्वागतही करत होता. आपण कुणाच्या बाजूचे आहेत हे समोरच्याला कळूच नये याची आता अनेक मतदार खबरदारी घेतात. तेच या शेतकऱ्याच्या बोलण्यातही जाणवत होते.गावात फिरताना काच, कागद, पत्रा गोळा करणाºया काही महिला भेटल्या. आपणाला घरकूल, गॅस काहीच मिळाले नसल्याचे यातील काही महिला सांगत होत्या. काही महिलांनी मात्र गॅस मिळाल्याचे सांगितले. या महिलांपैकी काहीजणी मोदी सरकारच्या बाजूने तर काही विरोधात बोलत होत्या. एक गॅसची योजनाही लोकांचे सरकारबद्दलचे मत बनविण्यास अशी कारणीभूत ठरते. या योजना मतांसाठीच असतात की काय? असा प्रश्न त्यातून पडतो. भाजप-काँग्रेस या दोन्ही बाजूने घोषणा झाल्या व होतील. मात्र, या महिलांच्या पाठीवरील कचºयाची गोणी हटविण्यात काँग्रेसप्रमाणेच मोदी सरकारही अपयशी ठरल्याचे दिसते.वांबोरीची व्यापारी पेठही मोठी आहे. एक कापड दुकानदार भेटले. त्यांची इंग्रजीची जाण उत्तम होती. सोबत इंग्रजी वर्तमानपत्रही होते. सुरुवातीला मोदी यांच्या काही धोरणांचे त्यांनी कौतुक केले. पण, जेव्हा ग्रामीण भागावर विषय आला तेव्हा शेतकरी नाराज असल्याचे सांगितले. जेव्हा विषय वांबोरीवर आला तेव्हा त्यांनी स्थानिक प्रश्न मांडत सर्वच पक्षांबाबत नाराजी नोंदवली. आमच्या गावात साधे वरिष्ठ महाविद्यालय आजवर होऊ शकले नाही ही त्यांची प्रमुख खंत होती. माझी पिढी गेली, पण पुढील पिढ्यांसाठी तरी गावात शिक्षणाची सोय होणार की नाही? किती दिवस आम्ही नेत्यांचा नुसता जयजयकार करायचा? त्यांना हे प्रश्न विचारणार की नाही? अशी खदखद ते बोलून दाखवत होते.वांबोरी सोडून खोसपुरीकडे निघालो. खोसपुरीत विहिरींचे पाणी पूर्ण आटले आहे. गावाच्या चौकात उभे राहिलो तरी दुष्काळ जाणवतो. एका सलून दुकानात काही गावकरी बसले होते. एका शेतकºयाला बोलते केले. वर्षभराचा आपला आर्थिक प्रवास त्याने मांडला. त्याची पाच एकर शेती आहे. तो म्हणाला, यावर्षी सात-आठ पोते बाजरी झाली. हरभरा, ज्वारी पाण्याअभावी जळून गेली. सरकारने दोन हजार रुपये अनुदान दिले. त्यात काय होणार? त्यात मी काही पैसे टाकले व मुलांना दूध पिण्यासाठी शेळी घेतली आहे. मतदानाचा विषय काढला. तेव्हा सगळे लोक चिडीचूप झाले. ‘काहीच सांगता येणार नाही’ अशी सर्वांची एकमुखी प्रतिक्रिया होती.खोसपुरीतून शिराळला गेलो. येथील गावकरी सांगत होते. आमच्या गावात सात पाणी योजना झाल्या. पण, तरी प्यायला पाणी नाही. येथे जनावरांची चारा छावणी सुरु आहे. तेथे दुपारी सावलीला काही शेतकरी बसले होते. तेथेच आम्ही गप्पांचा फड रंगविला. यातील काही लोक जरा बिनधास्त दिसले. न घाबरता भाजप व राष्टÑवादी या दोन्ही उमेदवारांच्या कमीजास्त बाजू काय आहेत? याचे विश्लेषण मांडत होती. अर्थात ते कुणाला मत देतील हे मात्र त्या चर्चेतून समजू शकले नाही. या गप्पांमध्ये छबुराव मुळे या निवृत्त शिक्षकांनी जुन्या काळातील काही आठवणी सांगितल्या.पूर्वी काँग्रेस व कम्युनिस्ट पक्ष यांचे वर्चस्व होते. तेव्हाच्या प्रचारात एक गुणवत्ता व सकसपणा होता असे ते म्हणाले. शाहीर अमर शेख आमच्या भागात काँग्रेसच्या प्रचारासाठी कलापथक घेऊन यायचे. ‘बैलजोडीची खूण धर ध्यानी गं, मतदानाला चल माझ्या राणी गं’ हे अमर शेखांचे गाणे त्यांना आजही आठवते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर